नागपूर हादरले..नवरा बलात्काराच्या आरोपामुळे फरार असताना घरी पत्नी एकटीच अन त्यानंतर ..

नवरा बलात्काराच्या गुन्ह्यात आरोपी असल्याने तो फरार झाला आणि त्यानंतर घरी एकटीच असलेल्या त्याच्या पत्नीवर दिराने बलात्कार केल्याची घटना नागपूरनजीक हिंगणा हद्दीत उघडकीस आली. वहिणीच्या तक्रारीवरून पोलिसांनी दिराविरूद्ध गुन्हा दाखल केला असून सदर दीर हा देखील फरार असल्याची माहिती आहे .

उपलब्ध वृत्तानुसार, पीडित २२ वर्षीय महिलेच्या पतीने २०१६ मध्ये एका तरुणीवर बलात्कार केला होता आणि या गुन्ह्यात महिलेचा पती फरार होता. त्यानंतर पोलिसांनी पकड वारंट काढून १४ सप्टेंबर २०२१ रोजी त्याला अटक केली. त्याला मेडिकलमध्ये वैद्यकीय तपासणीसाठी नेले असता तो मेडिकलमधून पसार झाला. पोलिसांनी बराच काळ शोध घेऊनही तो त्यांच्या हाती आला नाही . घरी येणे धोकादायक असल्याने तो घरी येत नसल्याने त्याची पत्नी ही घरी एकटीच होती

वाहिनी घरी एकटीच असल्याच्या संधीचा फायदा घेत ४ ऑक्टोबर २०२१ रोजी दुपारी चारच्या सुमारास दिराने तिच्यावर बलात्कार केला. ही माहिती कुणाला दिल्यास त्याने जिवे मारण्याची धमकी दिली . त्यानंतर त्याने सोमवारी सकाळी १० च्या सुमारास तिच्यावर बलात्काराचा प्रयत्न केला. त्यावेळी महिला जोरात ओरडली असता आरोपी पळून गेला. याप्रकरणी हिंगणा पोलिसांनी बलात्काराचा गुन्हा दाखल केला आहे.