धक्कादायक..मध्यरात्री महिलेच्या घरात पोलीस कॉन्स्टेबल ‘ आक्षेपार्ह ‘ अवस्थेत आढळला अन त्यानंतर ..

शेअर करा

देशात अनेक धक्कादायक घटना समोर येत असतानाच अशीच एक घटना राजस्थान इथे समोर आली असून जमावाच्या तावडीत सापडलेल्या एका पोलीस कॉन्स्टेबलला नागरिकांनी जबरदस्त मारहाण केली. संबंधित पोलीस कॉन्स्टेबल हा दलित महिलेच्या घरात मध्यरात्रीच्या सुमारास शिरला आणि त्याने तिच्यावर बलात्कार केला मात्र याच दरम्यान महिलेला जाग आली आणि तिने आरडाओरडा सुरु केला. तिच्या भेदरलेल्या आवाजाने घरातील इतर सदस्य आणि शेजारचे लोक जागे झाले आणि त्यांनी या पोलीस कॉन्स्टेबलला पकडले आणि बेदम मारहाण केली. भारत-पाकिस्तान सीमेवरील बाडमेर जिल्ह्यात राजस्थानमध्ये हा प्रकार उघडकीस आला आहे .

उपलब्ध माहितीनुसार, आरोपी कॉन्स्टेबल सुल्तान सिंह हा बाडमेर जिल्ह्यातील शिव पोलीस ठाण्यात तैनात आहे. सोमवारी रात्री महिला घरात एकटी असल्याचे पाहून कॉन्स्टेबलने घरात प्रवेश केला आणि तेथे त्याने महिलेवर बलात्कार केला. पीडित महिलेच्या ही गोष्ट लक्षात येताच तिने आरडाओरडा केला आणि घरातील सर्व सदस्यांनी मिळून या पोलीस कॉन्स्टेबलला पकडून बेदम मारहाण केली. पोलीस कॉन्स्टेबलला जखमी अवस्थेत बाडमेर जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले असून प्रकरणाचा तपास उपअधीक्षक आनंद सिंह यांच्याकडे सोपवण्यात आला आहे .

पोलीस अधीक्षक आनंद शर्मा म्हणाले की, घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी जागेवर पोहचत जखमी कॉन्स्टेबलला बाडमेर जिल्हा रुग्णालयात दाखल केले. तेथे त्याच्यावर उपचार सुरू आहेत. पीडितेने कॉन्स्टेबल सुल्तान सिंह याच्यावर रात्री 2 वाजता घरात घुसून तिच्यावर बलात्कार केल्याचा आणि तिला जातीवाचक शिवीगाळ केल्याचा गुन्हा दाखल केला आहे.


शेअर करा