पुणे हादरले..लेफ्टनंट कर्नल महिलेचा गळफास घेतलेल्या अवस्थेत मृतदेह आढळला

पुण्यातून एक धक्कादायक बातमी समोर आली असून भारतीय सैन्यात लेफ्टनंट कर्नल पदावर कार्यरत असणाऱ्या एका महिला अधिकाऱ्याने गळफास घेत आत्महत्या केली आहे .संबंधित महिला अधिकाऱ्याने पुण्यातील वानवडी परिसरातील आपल्या राहत्या घरात गळफास घेत आयुष्याचा शेवट केला. पुण्यातील मिलिटरी इंटेलिजन्स ट्रेनिंग स्कुलमध्ये त्या प्रशिक्षणासाठी आल्या होत्या. वानवडी पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली असून घटनेचा तपास सुरू केला आहे.

उपलब्ध वृत्तानुसार, रश्मी आशुतोष मिश्रा असं आत्महत्या करणाऱ्या महिला अधिकाऱ्याचं नाव असून त्या देहरादून येथील रहिवासी आहेत. त्या पुण्यातील मिलिटरी इंटेलिजन्स ट्रेनिंग स्कुलमध्ये सहा महिन्यांच्या प्रशिक्षणासाठी आल्या होत्या. मृत रश्मी मिश्रा या सध्या भारतीय सैन्यात लेफ्टनंट कर्नल पदावर कार्यरत असून सहा महिन्यांच्या प्रशिक्षणासाठी पुण्यात आल्या होत्या.

मृत्यूसमयी त्यांचे वय ४३ होते. आत्महत्येची ही घटना उघडकीस येताच लष्करी प्रशासनातील अधिकाऱ्यांना धक्का बसला आहे. मृत रश्मी मिश्रा यांनी कौटुंबीक कारणावरुन आत्महत्या केली असल्याची प्राथमिक माहिती आहे. घटनेची माहिती मिळताच लष्कराचे वरिष्ठ अधिकारी आणि पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली आहे. संबंधित आत्महत्या लष्कराची संबंधित असल्याने या घटनेचा तपास वरिष्ठ पातळीवरुन सुरू करण्यात आला आहे.