धक्कादायक..म्हणून तो बायकोसाठी ‘ कोब्रा ‘ साप घेऊन आला , कोर्टात प्रकरण गेले अन ..

शेअर करा

देशात अनेक धक्कादायक घटना उघडकीस येत असताना अशीच एक घटना केरळ इथे उघडकीस आली होती. एका तरुणानं आपल्या पत्नीची हत्या करण्यासाठी चक्क अतिविषारी कोब्रा सापाचा वापर केला आणि तिच्या खोलीत कोब्रा साप सोडून दिला. साप चावल्याने तिचा मृत्यू झाला असा बनाव देखील त्याने केला मात्र माहेरच्या मंडळींना संशय आला आणि त्यांनी पोलिसात धाव घेतली . पोलिसांनी आरोपी पतीला अटक केली असून आरोपीनं आपल्या गुन्ह्याची कबुली दिली आहे. न्यायालयाने 13 ऑक्टोबर रोजी या आरोपीला दुहेरी जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे .

केरळातील कोल्लम येथे ही धक्कादायक घटना उघडकीस आली होती. आरोपी पतीचं नाव सूरज असं असून उथरा असं मृत पत्नीचं नाव आहे. काही दिवसांपूर्वी आरोपीचं मृत उथराशी लग्न झालं होतं. आरोपी सूरजला लग्नामध्ये भरपूर हुंडा देण्यात आला सोबतच रोख रक्कम, नवीन कार आणि सोन्याचे दागिने यासह अनेक मौल्यवान वस्तूंचा समावेश होता मात्र तरीदेखील लग्न झाल्यानंतर काही दिवसात त्याने उथराचा हुंड्यासाठी छळ सुरू केला .

एकदा आरोपीनं मृत महिलेच्या खोलीत कोब्रा साप सोडून तिची हत्या करण्याचा प्रयत्न केला मात्र त्यावेळी साप तसाच निघून गेल्याने त्याचा प्लॅन फसला त्यानंतर 7 मे 2020 रोजी पत्नी घरात झोपली असताना त्याने दुसऱ्यांदा कोब्रा साप तिच्या बेडरूममध्ये सोडला आणि त्याने पत्नीला दंश केला. कोब्राने दंश केल्यानंतर तिचा मृत्यू झाला मात्र माहेरच्या मंडळींना सूरजवर संशय असल्याने सूरजला बेड्या ठोकण्यात आल्या.

पोलिसी खाक्या दाखवताच आरोपींने आपल्या गुन्ह्याची कबुली दिली असून सर्पदंशाने हत्या घडवून आणण्यासाठी त्याने एका गारुड्याकडून साप विकत घेतल्याचं देखील कबुल केलं आहे. याप्रकरणी कोर्टानं आरोपी सूरजला दोषी ठरवलं असून आरोपीला दुहेरी जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे .


शेअर करा