संग्राम जगताप यांच्या प्रयत्नांना यश, महापालिकेकडून नगरकरांसाठी ‘ गुड न्यूज ‘

अहमदनगर महापालिकेने दिवाळीच्या मुहूर्तावर एक गूड न्यूज नगरकरांना दिली असून मालमत्ता थकबाकीदार यांसाठी मोठी सवलत जाहीर केली आहे. थकबाकी वरील 75% शास्ती माफीची घोषणा आयुक्त शंकर गोरे यांनी बुधवारी केली असून ही सवलत 31 ऑक्टोबर पर्यंतच असल्याची माहिती आहे.

आमदार संग्राम जगताप यांनी शास्ती माफ करण्याची मागणी आयुक्त गोरे यांच्याकडे केली होती, या मागणीची दखल घेऊन आयुक्तांनी 75% शास्ती माफ करण्याचा निर्णय जाहीर केला आहे. महापालिकेची थकबाकी 222 कोटींवर पोहोचली आहे. वर्षभरात कोरोनामुळे केवळ 31 कोटींची वसुली झाली. कोरोनाचा मोठा परिणाम महापालिकेच्या कर वसुलीवर झालेला आहे. आर्थिक संकटात सापडलेले नगरकर आणि मोठ्या प्रमाणावर घटलेले रोजगार यामुळे देखील हा परिणाम झालेला आहे. कोरोना कारणामुळे नागरिकांना बिलाचे देखील वाटप झालेले नाही.

आर्थिक संकटात असलेल्या नागरिकांना पालिकेचा कर भरणे शक्य झाले नाही. कोरोनाच्या संकटकाळात महापालिकेने अशा परिस्थितीत सवलत देऊन नागरिकांना दिलासा द्यावा असे केल्यास नागरिक स्वतःहून कर भरतील त्यामुळे ही सवलत देण्यात यावी, अशी मागणी आमदार संग्राम जगताप यांनी महापौर यांच्याकडे केली होती .

नगर शहरातील विविध सामाजिक संघटनांनी देखील हा कर पूर्णपणे माफ करण्याची मागणी केली होती. महापालिका थकबाकी दरमहा दोन टक्के शास्ती आकारते तर पहिल्या वर्षात 18 टक्के तर दुसऱ्या वर्षात 24 टक्के शक्ती लागते त्यामुळे थकबाकीची रक्कम वाढली. शास्तीवर 75 टक्के सूट दिल्याने कर वसुली होईल, अशी महापालिकेला आशा आहे मात्र ही सवलत 31 ऑक्टोबर पर्यंत कर भरणार यासाठीच आहे, असे महापालिकेकडून सांगण्यात आले आहे आहे.