हॅट्स ऑफ.. ‘ म्हणून ‘ एकही साक्षीदार पलटला नाही अन आरोपीला..

शेअर करा

न्यायालयात गेले की अनेकदा साक्षिदार पलटतात आणि आरोपी पुन्हा जेलमधून सुटून बाहेर उजळ माथ्याने फिरायला मोकळे होतात मात्र जळगाव येथील या घटनेत चक्क एकही साक्षीदार पलटला नाही आणि आरोपीला शिक्षा सुनावण्यात आली. रात्री झोपेत असलेल्या नऊ वर्षीय मतिमंद मुलीला उचलून मद्याच्या नशेत अत्याचार करणाऱ्या अर्जुन अशोक पाटील ( वय 32 राहणार डिकसळ तालुका जळगाव ) या आरोपीला न्यायालयाने बुधवारी 14 वर्ष कारावास आणि नऊ हजार रुपये दंडाची शिक्षा ठोठावली आहे.

अत्यंत धक्कादायक अशा घडलेल्या या घटनेत पीडित मुलगी ही मतिमंद असल्याने तिने शाळेच्या मुख्याध्यापकांना समोर हातवारे करत जशीच्या तशी घटना कथन केली आणि मुख्याध्यापकांनी या इशाऱ्याचे रूपांतर बोलीभाषेत करून न्यायालयाला सांगितले. त्यानुसार अतिरिक्त जिल्हा सत्र न्यायाधीश डीएन खडसे यांनी हा निकाल दिला. पीडितेवर अत्याचार करून पळून जात असताना मुलीच्या नातेवाईकांनी या नराधमाला पकडले आणि त्यानंतर मुलीने झालेला प्रकार तिच्या आईला सांगितला होता.

पोलीस निरीक्षक प्रवीण वाडीले, हवालदार रवींद्र पाटील व इतरही अनेक साक्षीदार शेवटपर्यंत आपल्या म्हणण्यावर ठाम राहिले हे दुर्लभ दृश्य देखील या प्रकरणात पाहायला मिळाले. प्रवीण वाडीले, पीडित मतिमंद मुलीच्या विद्यालयाचे मुख्याध्यापक डॉक्टर रुद्राजी शेळके, डॉक्टर कैलास पाटील यांच्यासह इतरही 17 साक्षीदार तपासण्यात आले. यातील एका साक्षीदाराचा उलटतपासणी पूर्वीच मृत्यू झाला. माणुसकीला काळीमा फासणाऱ्या या घटनेवर सहाय्यक सरकारी अभियोक्ता निलेश चौधरी यांनी प्रभावी युक्तिवाद केला आणि त्यानंतर प्रत्येक कलमात आरोपीला दोषी ठरवून शिक्षा सुनावण्यात आली आहे .


शेअर करा