पुणे हादरलं..’ उत्पादनाची माहिती द्यायला तू लॉजवर ये ‘ , अन त्यानंतर ..

शेअर करा

गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्रात महिलांविरोधी होणाऱ्या अत्याचारात वाढ झाली असल्याचे पहायला मिळते आहे अशातच एका बलात्काराच्या घटनेनं पुणे हादरलं आहे. पुणे इथे एका युवतीला उत्पादनाची माहिती देण्याच्या बहाण्याने बोलवून तिच्यावर अत्याचार केला असल्याची घटना उघडकीस आली असून पीडित तरुणीनं बंडगार्डन पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित तरुणी एका कंपनीच्या उत्पादनाची ग्राहकांना माहिती देण्याचं काम करते. कंपनीच्या उत्पादनाची माहिती देत असताना पीडितेची आरोपीशी ओळख झाली होती. यातूनच आरोपीनं अन्य एका ग्राहकाला उत्पादनाची माहिती देण्यास तू ये , असे सांगितले आणि पीडित तरुणी तिथे लॉजवर पोहचली असताना आरोपीनं पीडित तरुणीची नजर चुकवून तिला शीतपेयातून गुंगीचं औषध दिलं आणि तिच्यावर बलात्कार केला.

नराधम आरोपी एवढ्यावरच थांबला नाही, तर त्याने बलात्कार करतानाचे फोटो आणि व्हिडीओज आपल्या मोबाइलमध्ये शूट केले . संबंधित अश्लील व्हिडीओ पीडित तरुणीच्या नवऱ्याला पाठवण्याची आणि सोशल मीडियावर व्हायरल करण्याची धमकी देत नराधम आरोपीनं पीडितेवर अनेकदा अत्याचार केला . धक्कादायक बाब म्हणजे पीडित तरुणीला चक्क आरोपीचे नाव देखील माहित नाही .

अखेर त्याचा त्रास असह्य होत असल्याने पीडित 25 वर्षीय पीडित तरुणीनं बंडगार्डन पोलीस ठाण्यात जाऊन अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल केला आहे. याप्रकरणी पोलीस तांत्रिक माहितीच्या आधारे आरोपीची ओळख पटवण्याचं काम करत आहेत. आरोपीचा शोध सुरू असून या घटनेचा पुढील तपास बंडगार्डन पोलीस करत आहेत.


शेअर करा