पुणे हादरले..’ टिंडर ‘ वरच्या व्यक्तीला उच्चभ्रू महिला भुलली अन..

पुणे परिसरात एक धक्कादायक घटना उघडकीस आली असून आयटी अभियंता असलेल्या महिलेला लग्नाचे आमिष दाखवून तब्बल ७३ लाख रुपयांना गंडा घालण्यात आला आहे . विशेष म्हणजे ही महिला या आरोपीला ‘ टिंडर ‘ या डेटिंग ऍप वर भेटली आणि त्यानंतर त्यांची ओळख झाली. ओळखीचे रूपांतर प्रेमात झाले आणि या आरोपीवर विश्वास ठेवत महिलेने तब्बल ७३ लाख रुपये आरोपीला दिले. वाकड पोलीस स्टेशनमध्ये आता महिलेने आरोपीच्या विरोधात तक्रार दाखल केली आहे .

काय आहे प्रकरण ?

पीडित महिलेची सिद्धार्थ रवी या व्यक्तीसोबत टिंडर वर ओळख झाली होती. आरोपी सिद्धार्थ रवी याने फिर्यादी महिलेशी ओळख वाढवून तिचा विश्वास संपादन केला. महिलेशी लग्न करण्याचे आणि भारतात येऊन स्थायिक होण्याचे आमिष तिला दाखवले. सिद्धार्थ रवीने फिर्यादी महिलेला महागडे गिफ्ट पाठवून तिचा विश्वास आधी जिंकला त्यानंतर तिला भेटण्यासाठी भारतात येत आल्याचे सांगितले त्यानंतर त्याच्याकडे एक कोटी रुपयांची मोठी रक्कम असल्याने त्याला दिल्ली विमानतळावर कस्टम ऑफिसरने पकडले असल्याचे त्याने फिर्यादी महिलेला सांगितले आणि तिने त्याच्यावर विश्वास ठेवत त्याला मदत म्हणून वरील रक्कम ती देत गेली.

इतकी मोठी रक्कम अडकलेली असल्याने वेगवेगळे चार्जेस, दंड, जीएसटी तसेच इतर अनेक कर भरायचे आहेत, अशी विविध कारणे त्याने महिलेला सांगितली अन वेगवेगळ्या बँकांचे खाते नंबर देऊन त्यावर फिर्यादीला 73 लाख 59 हजार 530 रुपये भरण्यास भाग पाडले. फसवणूक झाल्याचे निदर्शनास आल्यानंतर फिर्यादी महिलेने पिंपरी-चिंचवड पोलिसांच्या सायबर सेलकडे अर्ज करून तक्रार केली आहे.सिद्धार्थ रवी या व्यक्तीसह 18 बँक खाते धारकांच्या विरोधात पोलिसांकडून गुन्हा दाखल करण्यात आला असून तपास सुरु आहे.