मर्डर मिस्ट्री : औरंगाबाद येथील डॉ. राजन शिंदे खून प्रकरणात गूढ वाढले ?

महाराष्ट्रात अनेक धक्कादायक हत्येंच्या पोलिसांनी शोध लावलेला असला तरी औरंगाबाद येथील डॉ. राजन शिंदे प्राध्यापक खून प्रकरणात पोलीस अद्यापही आरोपींपर्यंत पोहचू शकलेले नाहीत. हत्येला पाच दिवस उलटले तरीही पोलीस आरोपींपर्यंत पोहोचू शकलेले नाहीत. पोलीस कसून शोध घेत असले तरी अद्याप काही यश आलेले नाही . डॉ. राजन शिंदे यांच्या पत्नीने उस्मानाबाद उपकेंद्रावरून औरंगाबाद विद्यापीठात बदलीची मागणी केली होती म्हणून पोलिसांचे विशेष चौकशी पथक उस्मनाबादेतही पोहोचले होते तिथे देखील चौकशी करण्यात आली आहे.

डॉ. शिंदे यांच्या हत्येसाठी वापरण्यात आलेल्या हत्यारांचा शोध घेण्यासाठी पोलिसांच्या पथकाने अग्निशमन दलाच्या मदतीने शिंदे यांच्या घराच्या परिसरातील तीन विहिरींची तपासणी केली . पहाटे साडेचार वाजताच घराच्या परिसरातून बाहेर पडलेल्या गाड्यांचे रस्ते तपासले. रस्त्यावरील दुभाजक, साइडच्या कचराकुंड्यांमध्ये हत्यार, कपडे टाकण्यात आले का ? याचाही तपास पोलिसांनी केला मात्र अद्याप हाती काही लागले नसल्याचे वृत्त आहे .

सोमवारी 11 ऑक्टोबर रोजी सकाळी डॉ. शिंदे रक्ताच्या थारोळ्यात पडलेले दिसले. अत्यंत धक्कादायक आणि वेदनादायी अशा खुनाने औरंगाबादमध्ये खळबळ उडाली. घटनेनंतर डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या उस्मनाबाद येथील उपकेंद्रातील एका सहकाऱ्याशी संपर्क साधून पत्नीने पतीचा खून झाला असून आज आपण ड्युटीवर येणार नसल्याचे कळवले. शिंदे यांच्या पत्नीने शेजाऱ्यासह इतरांशी 6 वाजेपूर्वीच कॉल केले असल्याचे तपासात पुढे आले आहे .

दुसऱ्या दिवशी पोलिसांनी कुटुंबातील सदस्यांची सखोल चौकशी केली. चौकशीत कुटुंबातील सदस्यांनी सहकार्य केले नसल्याची माहिती पोलीस अधिकाऱ्यांनी दिली. रात्री १ वाजताच सर्व जण झोपी गेल्याचे पत्नीने सांगितले आहे तर एका सदस्याच्या नेट सर्चिंगमध्ये वेगवेगळ्या किलर सिरीज सर्च करणे, पाहणे, त्याविषयी काही टिपण काढल्याच्याही नोंदी सापडल्याची माहिती पोलीस सूत्रांनी दिली आहे .

खालील प्रश्नांची उत्तरे अद्यापही मिळालेली नाहीत.

१. डॉ. शिंदे हे रविवारी रात्री ११.३० वाजता घरी आल्याचे त्यांच्या घरापासून तिसऱ्या घराच्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाले. पहाटे ५.३० वाजता मुलगा घराबाहेर पडल्याचे, काही वेळाने ॲम्ब्युलन्स घरी आल्याचे सीसीटीव्हीत दिसते. त्याशिवाय कोणी बाहेरील व्यक्ती घरात गेला असता तर तोही कॅमेऱ्यात कैद झाला असता. मग खून घरातीलच एखाद्या सदस्याने केला काय ?

२. मुलाने वडिलांचा मृतदेह रक्ताच्या थारोळ्यात पडलेला असताना घरातील आई, बहीण, आजी-आजोबांना न सांगता थेट दवाखाना कशासाठी गाठला ? त्याने घरातील इतर कुटुंबीयांना माहिती का दिली नाही ?

३. ॲम्ब्युलन्स दारात आल्यानंतर चालकाला हे प्रकरण पोलिसात कळविण्याची सूचना देऊन निघून गेला त्यानंतर मुलाने बहिणीला उठवून पोलीस चौकीत सोबत नेले मात्र आईला उठवले का नाही?

४. मुलीनेही वडिलांचा मृतदेह पाहून आईला किंवा इतर कोणत्या सदस्याला ना सांगता थेट भावासोबत जाणे योग्य का मानले ? तोपर्यंत आईसुद्धा झोपेतच होती. आईच्या परस्पर मुलांनी दवाखाना किंवा पोलीस चौकी का गाठली?