संतापजनक..’ हिंदुस्थान निर्लज्ज लोकांचा देश ‘ मनोहर भिडेंची जीभ घसरली , पहा काय म्हणाले ?

शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान संघटनेचे अध्यक्ष मनोहर भिडे आपल्या वाचाळवीरपणामुळे आणि द्वेषपूर्ण वक्तव्यामुळे कायमच चर्चेत असतात मात्र आता त्यांनी कळस गाठला असून त्यांनी चक्क देशातील लोकांना ‘ निर्लज्ज ‘ म्हणत देशाचा देखील अपमान केला आहे. आज शिवप्रतिष्ठानच्या दुर्गामाता दौदचा समारोप होता त्यावेळी , ‘भारत म्हणजे गुलामी, दास्याच्या नरकात राहणाऱ्या बेशरम लोकांचा, देश आहे. दीर्घ काळ परक्यांचा मार खात, दास्यत्व स्वीकारत, खरकटं उष्टं खात, निर्लज्ज लोकांचा देश म्हणजे हिंदुस्थान आहे,’ असं निर्लज्ज वक्तव्य सांगलीत केले आहे. त्यांच्यावर आता देशद्रोहाचा गुन्हा दाखल होणार का ? हे येत्या काळात पाहावे लागणार आहे.

काय म्हणाले मनोहर भिडे ?

जगात क्रमांक दोनची लोकसंख्या असलेला आपला देश, मग आपल्या देशाचा क्रमांक एक नंबर कधी येणार. तो क्रमांक एक आपण मिळवला आहे, कुठल्या गोष्टीत ? तो म्हणजे निर्लज्जपणात. जगाच्या पाठीवरती 187 राष्ट्र आहेत. पण, पारतंत्र्य, गुलामीत राहण्याचा बेशरमपणा असलेल्या बेशरम लोकांचा आपला देश आहे. दीर्घ काळ परक्यांचा मार खात, दास्यत्व स्वीकारत, खरकटं उष्टं खात, निर्लज्ज लोकांचा देश म्हणजे हिंदुस्थान आहे.

भारत देशात देशभक्तीचा, जाणिवेचा प्राण नाही. कशासाठी पोटासाठी खंडाळासाठी इतकीच त्याची लायकी आहे. आपला-परका कोण मित्र कोण हे कळत नाही. या देशात कसली सरकार आहे. हा देश जगाचा बाप बनावा, यासाठी मोठी मोहीम छत्रपती शिवाजी महाराजांनी हाती घेतली होती. ती मोहीम पार पाडण्यासाठी आपण मोहीम करतो. पण मागच्या वर्षी आपल्या या कर्तृत्वसंपन्न शासनाने महाराष्ट्रात कोरोनाचे कारण देत नकार दिला. कोरोना हा काल्पनिक आहे. कोरोना हा ना स्त्री ना पुरुष यांना न होणारा कोरोना आहे. कोरोना हा थोतांड आहे. चीनने तुम्हाला आणि आम्हाला पालथं पाडण्यासाठी केलेली बदमाशी आहे.

मनोहर भिडे यांच्या या वादग्रस्त वक्तव्यावरून सोशल मीडियात मोठी टीकेची झोड उठलेली असून भिडे यांस अटक करवून देशद्रोहाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी नेटिझन्स करत आहेत. वृत्त लिहीपर्यंत कोणत्याही राजकीय पक्षाने यावर प्रतिक्रिया दिली नसून ‘ आंबा खाल्याने मुले होतात ‘, ‘ कोरोना थोतांड आहे ‘ असे अनेक अकलेचे तारे मनोहर भिडे यांनी याआधी देखील तोडलेले आहेत .