पाथर्डीत भारतीय लहुजी युवा सेनेच्या विविध पदाधिकाऱ्यांची निवड

पाथर्डी प्रतिनिधी: पाथर्डी येथील शासकीय विश्रामगृहात भारतीय लहुजी युवा सेनेची दिनांक १० ऑक्टोबर रोजी बैठक झाली. या बैठकीत विविध पदाधिकाऱ्यांची निवड करून त्यांना निवड पत्र देण्यात आले.

भारतीय लहुजी युवा सेनेचे पाथर्डी येथे सरसेनापती व्हि. जी. रेड्डी यांच्या आदेशानुसार युवा राज्यप्रमुख अभिमान कांबळे यांच्या अध्यक्षतेखाली नुकतीच शासकीय विश्रामगृहात तीन तालुक्यातील अध्यक्षांच्या सहकार्याने बैठकीचे आयोजन करून विविध पदाधिकार्‍यांची निवड करण्यात आली. तसेच नवीन पदाधिकाऱ्यांना मान्यवरांच्या हस्ते निवडीचे पत्र देण्यात आले.

राष्ट्रीय अध्यक्ष बाळासाहेब बागुल, राष्ट्रीय सचिव हानीफभाई पठाण, राज्य प्रमुख सुरेश आडागळे, राष्ट्रीय उपाध्यक्ष रणजीत बाराळीकर, युवा राज्यप्रमुख अभिमान कांबळे, राज्य प्रमुख सोमनाथ गायकवाड यांचे हस्ते संजय ससाणे युवा प्रमुख पश्चिम महाराष्ट्र, सुखदेव ससाणे युवा प्रमुख शेवगाव तालुका, सुरेश गायके सचिव अहमदनगर, सचिन रोकडे पाथर्डी तालुकाध्यक्ष, गहिनीनाथ साबळे आष्टी तालुका उपप्रमुख, नागेश वाघमारे शाखाप्रमुख टप्पा पिंपळगाव इत्यादी पदाधिकाऱ्यांची निवड करून त्यांना निवडीचे पत्र देण्यात आले आणि त्यांना पुष्प देऊन त्यांचा सत्कार केला व अभिनंदन करून पुढील कार्यास शुभेच्छा दिल्या.
यावेळी भारतीय नवनिर्माण सेनेचे जिल्हा अध्यक्ष अर्जुन ससाणे, रवी वाघमारे, सतीश वाघमारे, गोरख वाघमारे, लक्ष्मण लोंढे, शिवाजी शिरसाठ व लहुजी सेनेचे इतर कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.