महाराष्ट्र हादरला..स्टिंग ऑपरेशनमध्ये नेत्ररोगतज्ञ डॉक्टरचा ‘ तसला ‘ कारनामा कैद

शेअर करा

महाराष्ट्र्रात रोज धक्कादायक घटना उघडकीस येत असताना अशीच एक घटना अकोला जिल्ह्यातून समोर आली असून अकोला येथील एका प्रसिद्ध डॉक्टरनं स्वत:च्या पुरुष रुग्णासोबत अनैसर्गिक संबंध ठेवण्याचा प्रयत्न केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. डॉ. अनंत शेवाळे असे आरोपीचे नाव असून तो अकोला जिल्ह्यातील प्रसिद्ध नेत्ररोगतज्ज्ञ आहे. मोठ्या डॉक्टरला बेड्या ठोकण्यात आल्याने अकोल्यात मोठी खळबळ उडालेली आहे . दैनिक लोकमतने याबद्दल वृत्त दिले आहे.

काही दिवसांपूर्वी पीडित व्यक्तीच्या मित्रासोबत डॉक्टरनं अनैसर्गिक संबंध ठेवण्याचा प्रयत्न केला. याबद्दलची सत्यता पडताळण्यासाठी तक्रारदार रुग्ण बनून डॉक्टरांकडे गेला. त्यावेळी डॉक्टरांनी त्याचे कपडे उतरवले आणि त्याच्याशी अनैसर्गिक संबंध ठेवण्याचा प्रयत्न केला. धक्कादायक बाब म्हणजे रुग्ण बनून गेलेला व्यक्ती हा एका युट्युब चॅनेलचा पत्रकार आहे, याचा डॉक्टरला अंदाज आला नाही आणि त्याने तसला प्रयत्न करून पाहिला.

रुग्ण बनून गेलेल्या यूट्यूब चॅनलच्या प्रतिनिधीनं या सगळ्या घटनेचं स्टिंग ऑपरेशन केल असून सदर घटना ४ ऑक्टोबरला घडली. त्यानंतर व्हिडीओ पुराव्यांच्या आधारे तक्रारदारानं डॉक्टरविरोधात पोलिसांत तक्रार दाखल केली. पोलिसांनी डॉक्टरविरोधात भारतीय दंड विधानाच्या कलम ३७७ अंतर्गत गुन्हा दाखल केला असून प्रकरणाचा तपास सुरु आहे.


शेअर करा