देशात अनेक धक्कादायक घटना समोर येत असताना नवी दिल्ली येथील एम्स हॉस्पिटलच्या वरिष्ठ निवासी डॉक्टरने कनिष्ठ महिला डॉक्टरला घरी पार्टीसाठी बोलावून तिच्यावर बलात्कार केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. पार्टीमध्ये महिला डॉक्टरला दारू पाजल्यानंतर ही घटना घडल्याचे महिलेचे म्हणणे आहे. महिला डॉक्टरने दिलेल्या तक्रारीवरून पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पीडित महिला डॉक्टरची तपासणी करण्यात आली असून या घटनेला दुजोरा प्राप्त झाला आहे मात्र अद्यापही सदर डॉक्टरला अटक करण्यात आलेली नाही.
आरोपी डॉक्टर हा एम्सच्या मेडिसीन विभागात वरिष्ठ अधिकारी आहे. तो आपल्या कुटुंबासह हाऊस खास या परिसरात राहतो. पीडित महिला देखील एम्समध्ये कनिष्ठ निवासी अधिकारी आहे. पीडित महिलेने पोलिसांना दिलेल्या तक्रारीमध्ये म्हटले आहे की, ‘ डॉक्टरने 10 ऑक्टोबर रोजी त्याच्या घरी पार्टी दिली होती. या पार्टीमध्ये पीडित महिलेने दारू पिण्यास नकार दिला होता मात्र डॉक्टरने तिला बळजबरीने दारू पाजली. दारू प्यायल्यानंतर पीडित व्यक्ती नशेच्या आहारी गेली आणि स्वतःच्या घरी न जाता डॉक्टरच्या घरी राहिली . आरोपी डॉक्टरने दारूच्या प्रभावाखाली हा गुन्हा केला, ‘असे पीडित महिलेचे म्हणणे आहे
दुसऱ्या दिवशी शुद्धीवर आल्यावर पीडित महिलेने झालेल्या प्रकारासाठी विरोध केला आणि डॉक्टरला यासाठी जाब विचारला, त्यावेळी डॉक्टरने जीवे मारण्याची धमकी दिली, असे पीडितेचे आहे म्हणणे आहे. पोलिसांनी महिलेच्या म्हणण्यानुसार गुन्हा दाखल केला असून सदर प्रकाराचा तपास सुरु असल्याचे समजते.