महाराष्ट्र हादरला.. ‘ आत्ताच्या आता ‘ म्हणत पत्नीने पतीच्या ओठातून रक्तच काढले

शेअर करा

महाराष्ट्रात रोज अनेक चमत्कारिक घटना उघडकीस येत आहेत. शालेय विद्यार्थ्यांपासून ते वडीलधाऱ्या व्यक्तींपर्यंत सर्वांनाच मोबाईलचे व्यसन लागलेले चित्र देशात निर्माण झालेले आहे. मोबाईलच्या नादात अनेकदा अपघात देखील झालेले आहेत तर गेममध्ये अपयश आले म्हणून आत्महत्या देखील झालेल्या आहेत. अनेक वेळा भांडणे देखील झाले आहेत मात्र याच भांडणातून एक धक्कादायक घटना समोर आली असून भंडारा जिल्ह्यातील मासळ येथे एका महिलेने अक्षरश: आताच्या आता माझा मोबाईल द्या, असे सांगत पतीवर विळा फेकून मारला आणि त्यात त्याचा ओढ कापला गेला आहे, सुदैवाने इतरत्र कुठे जखम झाली नाही हे विशेष .

लाखांदूर तालुक्यातील मासळ येथे ही घटना घडलेली असून विवाहितेने मोबाईल परत न देणाऱ्या पतीवर चक्क विळ्याने हल्ला केला. बायकोने केलेल्या या हल्ल्यात पतीचा ओठ कापला गेला . खेमराज बाबुराव मुल असे हल्ल्यात जखमी झालेल्या पतीचे नाव आहे. हेमराज बाबुराव मुल ( वय 40 ) यांचा मोबाईल खराब झाल्याने त्यांनी पत्नीचा मोबाइल तात्पुरता वापरण्यासाठी घेतला होता. मात्र मोबाईल रिपेअर होण्यासाठी उशीर लागत असल्याने त्यांनी दोन दिवस उलटून देखील पत्नीचा मोबाईल परत दिला नव्हता या कारणावरून त्या दोघांमध्ये भांडणे झाली आणि पत्नीचा संताप अनावर झाला.

भांडण इतके विकोपाला गेले की रागाच्या भरात तिने घरातील विळा हेमराज यांना फेकून मारला. हेमराज यांच्या तोंडाला विळा लागून त्यांचे ओठ कापले गेले असल्याचे समजते. जखमी खेमराज यांना लाखांदूर ग्रामीण रुग्णालयातील दक्षता विभागात दाखल करण्यात आले असून त्यांचे तोंडी बयान आणि वैद्यकीय तपासणीनंतर शुक्रवारी पत्नीच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे .


शेअर करा