पुणे हादरले..एकुलत्या एका दिवट्याचे ‘ असे ‘ नीच काम , बहिणीने दिली फिर्याद

शेअर करा

देशाला स्वातंत्र्य मिळून अनेक वर्षे झाली तरीदेखील लोकांच्या मानसिकतेत अद्यापही बदल झालेला नसून मुलगाच हवा या हव्यासापोटी लोक काहीही करायला तयार होतात, मात्र जन्माला आलेला मुलगा जर वैरी ठरत असेल तर काय ? या प्रश्नाचे उत्तर कोणाकडेच नाही. अशीच एक धक्कादायक घटना पुणे येथे उघडकीस आली असून आईने दारू पिण्यासाठी पैसे दिले नाहीत म्हणून एकुलत्या एक मुलाने आईला बेदम मारहाण केली आणि त्याच्या या मारहाणीत या माउलीला आपला जीव गमवावा लागला. नऱ्हे इथे दसऱ्याच्या दिवशी उघडकीस आली होती. सचिन कुलथे असे या निर्दयी मुलाचे नाव असून विमल कुलथे असे मयत माऊलीचे नाव आहे.

सचिन व त्याची पत्नी आणि आई असे तिघेजण रहात असलेल्या कुटुंबात सचिनच्या व्यसनांवरून सातत्याने भांडणे होत होती. त्यास कंटाळून सचिन याची पत्नी एक वर्ष आधीच त्याला सोडून माहेरी निघून गेली आहे. दारूसाठी पैसे न दिल्याने शुक्रवारी दसऱ्याच्या दिवशी सचिन याने आईला लाकडाच्या दांड्याने मारहाण केली त्यात या माऊलीचा मृत्यू झाला. आईवर अंत्यसंस्कार झाल्यानंतर मुलगी अनिता चिंतामणी यांनी भावाच्या विरोधात पोलिसात तक्रार दिली आणि सचिन याला जंगलातून अटक करण्यात आली.

धक्कादायक बाब म्हणजे वंशाला दिवा हवा म्हणून कुलथे कुटुंबीय आग्रही होते. सहा मुलींच्या पाठीवर सचिन यांचा जन्म झाला होता त्यामुळे घरात तो सर्वांचाच अत्यंत लाडका होता. विमल कुलथे यांच्या पतीचे 2015 ला निधन झाले. घटस्थापनेच्या दिवशी अनिता चिंतामणी या घरी आईला भेटायला आल्या त्यावेळी आईच्या अंगावर वळ होते तेव्हा त्यांनी सचिन याने मारहाण केल्याचे मुलीला सांगितले होते मात्र ‘ मुलगा आणखी मारेल ‘ या भीतीने त्यांनी तक्रार देण्यास देखील नकार दिला होता, असेही चिंतामणी यांनी फिर्यादीत म्हटले आहे.


शेअर करा