भर वस्तीतील विहिरीत ‘ धपाक ‘ आवाज आल्याने नागरिक धावले तर..

शेअर करा

कोरोनानंतर अनेक नागरिकांच्या आर्थिक अडचणीत भर झाली असून अनेक जणांनी आत्महत्या देखील केलेल्या आहेत, अशीच एक धक्कादायक घटना परभणी जिल्ह्यात पाथरी शहरात उघडकीस आली असून हाताला काम नाही म्हणून आर्थिक विवंचनेत असलेल्या पतीने पत्नीच्या डोळ्यादेखत विहिरीत उडी घेतली. पतीने विहिरीत उडी मारलेली पाहून पत्नीने देखील पतीला वाचविण्यासाठी विहिरीत उडी मारली, मात्र तिला पतीला वाचविण्यात यश आले नाही. परिसरातील नागरिकांनी आवाजाने धाव घेत पत्नीला विहिरीतून बाहेर काढले मात्र पती वाचू शकला नाही, सदर घटनेबद्दल परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.

पाथरी शहरातील बसेरा कॉलनी येथे संजय लक्ष्मण उबाळे हे आपल्या कुटुंबासह राहत होते. पत्नी सुमन व सात वर्षाचा मुलगा असे कुटुंब मोलमजुरी करून आपला उदरनिर्वाह करत होते, मात्र मागील काही दिवसांपासून त्यांना काम मिळतच नव्हते त्यामुळे आर्थिक परिस्थिती देखील खालावलेली होती. मयत संजय हे सातत्याने तणावात राहत होते . शुक्रवारी दुपारी संजय हे विहीरीकडे जात असल्याने त्यांच्या मागे पत्नी त्यांच्या मागे गेली त्यावेळेस संजय यांनी विहिरीत उडी मारली. त्याच वेळी पतीला वाचविण्यासाठी म्हणून सुमन यांनी देखील विहिरीत उडी घेतली.

धपाक धपाक असे दोनदा आवाज आल्याने गल्लीतील लोकांनी विहिरीकडे धाव घेतली त्यावेळी दोघे दोन्ही दाम्पत्य विहिरीत पडलेले होते . पती-पत्नी विहिरीत पडलेले पाहून नागरिकांनी देखील त्यांना वाचवण्यासाठी प्रयत्न सुरू केले मात्र या घटनेत संजय उबाळे यांचा मृत्यू झाला तर पत्नी सुमन यांना मात्र वाचविण्यात यश आले.


शेअर करा