प्रेयसीसोबत गुलूगुलू सुरु असतानाच पत्नी सोबत ‘ त्यांना ‘ पण घेऊन आली, महाराष्ट्रातील घटना

शेअर करा

प्रेयसीला गुपचूपपणे हॉटेलमध्ये घेऊन आलेल्या पतीला कार मध्ये बसत असताना पत्नीने रंगेहाथ पकडले आणि जाब विचारला अशा एका पत्नीचा व्हिडिओ औरंगाबाद मध्ये चांगलाच व्हायरल झाला होता. असाच प्रकार बीड शहरात देखील घडला असून सोमवारी रात्री साडेआठ वाजता शहरातील गजबजलेल्या अण्णाभाऊ साठे चौकात हा प्रकार घडला आहे. प्रेयसीसोबत कार मधून ज्यूस बार मध्ये आलेल्या पतीला पत्नीने रंगेहाथ पकडले. तोंड लपवत दोघांनी पळून जाण्याचा प्रयत्न केला मात्र पत्नीने यांची भररस्त्यात चांगलीच धुलाई केली. सदर महिलेने त्यांना सोबत ज्यूस पिताना धरले आणि त्यानंतर हा राडा झाला.

उपलब्ध माहितीनुसार, शहरातील शिवाजीनगर ठाणे हद्दीत राहणारी एक व्यक्ती एका काळ्या कारमधून प्रेयसीसह अण्णाभाऊ साठे चौकातील एका जूस बार मध्ये आली होती. गेल्या अनेक दिवसांपासून या व्यक्तीच्या पत्नीला त्याच्यावर संशय होता त्यामुळे ती आपला भाऊ आणि सासू यांच्यासोबत पाठलाग करत याच बारमध्ये आली आणि त्यांना ज्यूस पिताना पकडले .

पत्नीने सोबत सासू व मेहुणा यांना पाहून देखील या पतीची चांगलीच गाळण उडाली त्याने तिथून पळून जाण्याचा प्रयत्न केला मात्र पत्नी कार समोर जाऊनच उभी राहिली आणि आणि पतीला तिथून हलणे शक्य झाले नाही. संतापलेल्या पत्नीने शिवीगाळ केल्यानंतर पतीने तिला समजावण्याचा प्रयत्न केला मात्र ती काहीएक ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हती. पतीची गचांडी पकडून तिने संताप व्यक्त केला तर प्रेयसीच्या डोक्याचे केस पकडून पत्नीने तिला जाब विचारला. भररस्त्यात सुरू असलेला हा प्रकार पाहून बघ्यांची देखील मोठ्या प्रमाणावर गर्दी झाली.

अखेर या पतीला प्रेयसीला घेऊन पळून जाण्यात यश आले आणि त्याने थेट शिवाजीनगर ठाणे गाठले तर दुसरीकडे पत्नीने शहर पोलिस ठाण्यात धाव घेतली . शहर ठाण्याच्या हद्दीत ही घटना घडून आल्याने शिवाजीनगर पोलिसांनी पतीला देखील शहर ठाण्यात जा असा सल्ला दिला. वृत्त लिहीपर्यंत या घटनेची पोलिसांत नोंद करण्यात आली नव्हती.


शेअर करा