…अन् भाजपाच्या नगरसेविकेने भर सभेत आयुक्तांना फेकून मारली चप्पल, पहा व्हायरल व्हिडीओ

शेअर करा

संस्काराच्या बड्या बड्या गप्पा एकीकडे मारायच्या मात्र दुसरीकडे त्याच्या अगदी उलट वागायचे ही भाजपच्या नेत्यांची नेहमीच खासियत राहिली आहे. भाजप नेत्यांची दबंगगिरी आणि कायदा हातात घेण्याचे प्रमाण केंद्रात भाजपची सत्ता आल्यापासून मोठ्या प्रमाणात वाढले आहे. पक्षातील वरिष्ठांकडून त्याच्या ह्या कृतीला पाठबळ मिळत असल्याने कायदा हातात घेऊन नागरिक असोत वा शासकीय अधिकारी यांचा भाजपवाल्यांना फरक पडत नाही.

अशातच भाजपच्या एका नगरसेविकेने आयुक्तांना भर सभेत चप्पल फेकून मारल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या घटनेचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे. सदर घटना उत्तर प्रदेशातील असून मथुरा नगरपालिकेच्या बैठकीत काही मुद्द्यांवरून वाद झाला त्यानंतर ही घटना दुर्दैवी घटना घडली .

उपलब्ध माहितीनुसार, १७ जुलैला मथुरा नगरपालिकेच्या एका सभेचं आयोजन करण्यात आलं होतं. यात नगरपालिकेतील विविध मुद्द्यांवर चर्चा सुरु असताना भाजपाच्या नगसेविका दीपिका राणी सिंह यांनी आयुक्त रविंद्र कुमार यांना चप्पल फेकून मारली . सभा सुरू असतानाच आयुक्त आपल्या प्रश्नांची दखल घेत नसल्याचं दिसल्याने दीपिका राणी सिंह यांचा राग अनावर झाला आणि संतापाच्या भरात त्यांनी आयुक्तांना चप्पल फेकून मारली.

या घटनेबद्दल सर्वत्र टीका होत असून आपल्या कृत्याचे स्पष्टीकरण देताना दीपिका राणी सिंह म्हणाल्या, ‘ मी शहराचे प्रश्न या सभेत मांडत होते. मात्र त्याची दखल न घेता आयुक्तांनीच मला बसायला सांगितलं त्याचा मला राग आला. त्यामुळे लोकांच्या प्रश्नावर राग अनावर झाल्याने मी हे कृत्य केलं ‘ या घटनेचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर जोरदार व्हायरल झाला आहे. आपली चुकीच्या कृत्याचे समर्थन करताना लोकांना पुढे करत त्यांनी बाजू सावरण्याचा प्रयत्न केला आहे .

याआधी देखील टिकटॉक स्टार असलेल्या अन नंतर भाजपमध्ये आलेल्या नेत्या सोनाली फोगट यांनी बाजार समितीच्या सचिवाला चपलेने मारहाण केली होती. ह्या घटनेचे दोन व्हिडीओ त्यावेळी व्हायरल झाले होते. पहिल्या व्हायरल व्हिडिओमध्ये सोनाली फोगट थप्पड मारताना दिसत होत्या तर दुसऱ्या व्हिडिओमध्ये सोनाली फोगट सेक्रेटरीला चक्क चपलेने मारताना दिसत होत्या ,असे निंदनीय प्रकार करणारांना भाजपमध्ये अभय असल्याने असे प्रकार राजरोस घडत आहेत.


शेअर करा