.. म्हणून इतके दिवस तडजोड केली मात्र ‘ तो ‘ जाच असह्य , उच्चभ्रू महिला पोलिसात

शेअर करा

देशात कौटुंबिक हिंसाचाराच्या बातम्या रोज येत असतात मात्र गुजराथमधून एक धक्कादायक बातमी आली असून अहमदाबाद इथे खासगी कंपनीत नोकरी करणाऱ्या एका ४५ वर्षीय महिलेने आय टी कंपनीचा मालक असलेल्या आपल्या नवऱ्याविरोधात अनैसर्गीक शरीरसंबंध आणि घरगुती हिंसाचाराची पोलिसात तक्रार नोंदवली आहे. नवरंगपुरा पोलिसात ह्या घटनेची नोंद झालेली असून पती आपल्याला छोट्या-छोट्या कारणांवरुन मारहाण करतो आणि सतत अनैसर्गीक शरीरसंबंधांची मागणी करतो, असे महिलेचे म्हणणे आहे. टाइम्स ऑफ इंडियाने हे वृत्त दिले आहे.

उपलब्ध वृत्तानुसार , तक्रारदार महिला नवरंगपूर येथे रहायला असून चार महिन्यापूर्वी नवऱ्याने आपल्याला सोडून दिले. त्यानंतर आपण आता आपल्या आई-वडिलांच्या घरी राहत आहोत. इच्छा नसताना नवरा अनैसर्गीक शरीरसंबंध ठेवण्याची मागणी करतो. त्याला विरोध केल्यानंतर मारहाण करतो. आपला नवरा हा पॉर्न फिल्मच्या प्रभावाखाली येऊन नवरा अनैसर्गिक शरीरसंबंधांची जबरदस्ती करत असायचा. अगदी छोट्या-मोठ्या गोष्टीवरुन नवरा मारहाण करायचा मात्र संसार मोडू नये म्हणून कुटुंबीयांच्या दबावामुळे प्रत्येकवेळी मी तडजोड केली , असे या महिलेने म्हटले आहे.

महिलेने अनेक वेळा समजावून देखील त्याच्या वागण्यात काही बदल झाला नाही त्यामुळे या महिलेने या त्रासाला कंटाळून पोलिसात तक्रार करण्याचा निर्णय घेतला. नवरा एक मोठी आयटी कंपनी चालवतो. पैसा वापरुन तो पोलिसांनाही प्रभावित करु शकतो, अशी देखील शक्यता असल्याने महिला बरेच दिवस शांत राहिली. घरगुती हिंसाचारा कायदा आणि आयपीसीच्या कलम ३७७ अनैसर्गिक शरीरसंबंध या कलमांखाली आरोपीविरोधात गुन्हा नोंदवण्यात आला असून तपास सुरु असल्याचे समजते.


शेअर करा