नगर जिल्ह्यातील ‘ ह्या ‘ मंत्र्याच्या पत्नीला कोरोनाची लागण.. मंत्री झाले क्वारंटाईन

शेअर करा

कोरोनाचा धुमाकूळ नगर जिल्ह्यात गेल्या काही दिवसात जास्तच वाढलेला आहे .नगर शहराचा बहुतांश भाग कंटेनमेंट झोनमध्ये असून आता उपनगरे देखील कंटेनमेंट झोन झाल्याने नागरिकांमध्ये चिंतेचे वातावरण आहे . जिल्ह्यातील काही गावे देखील कंटेनमेंट झोनमध्ये आहेत .

अशातच नेवासा मतदारसंघाचे आमदार तसेच राज्याचे जलसंधारण मंत्री शंकरराव गडाख यांच्या पत्नीला करोनाची लागण झाल्याचे वृत्त आल्यामुळे जिल्ह्यात खळबळ उडाली आहे . त्यानंतर शंकरराव गडाख स्वत: क्वॉरंटाइन झाले असून कुणीही भेटायला येऊ नये असं आवाहन त्यांनी कार्यकर्त्यांना केलं आहे. तर दुसरीकडे राष्ट्रवादीचे मराठवाड्यातील विधान परिषदेचे सदस्य बाबाजानी दुर्रानी यांनाही करोनाची लागण झाली असून त्यांच्यावर देखील उपचार सुरू आहेत.

शंकरराव गडाख यांच्या पत्नी सुनिताताई गडाख यांची काल करोना चाचणी करण्यात आली होती मात्र दुर्दैवाने त्यांचा अहवाल पॉझिटिव्ह आल्याने त्यांना रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. स्वत: गडाख यांनी ट्विटर आणि फेसबुकवरून ही माहिती दिली आहे. तसेच आपण होम क्वॉरंटाइन होणार असून काही दिवस कुणालाही भेटणार नसल्याचं त्यांनी म्हटलं आहे. शिवाय तुम्हीही तुमच्या घरीच राहा. कुटुंबीयांची काळजी घ्या, असं आवाहन गडाख यांनी केलं आहे.

दुसरीकडे राष्ट्रवादीचे मराठवाड्यातील विधान परिषद सदस्य बाबाजानी दुर्रानी यांच्यावर देखील उपचार सुरू आहेत. तसेच त्यांच्या कुटुंबीयांना होम क्वॉरंटाइन करण्यात आलं असून त्यांच्या संपर्कात आलेल्यांचा शोध घेण्यात येत आहे. बाबाजानी दुर्रानी यांची प्रकृती सध्या स्थिर आहे .


शेअर करा