शंभर कोटी लसीकरण ? मयत व्यक्तीच्या मोबाईलवर कोरोनाचा डोस घेतल्याचा मेसेज : कुठे घडलाय प्रकार

शेअर करा

देशात जवळपास शंभर कोटी जनतेला लसीकरण केल्याचा दावा केला जात असताना एक धक्कादायक घटना धुळे येथे उघडकीस आली असून आरोग्य विभागाचा लसीकरण बाबतचा सावळागोंधळ देखील समोर आला आहे . शिंदखेडा तालुक्यातील मालपुर येथे सहा महिन्यापूर्वी मयत झालेल्या व्यक्तीच्या मोबाईलवर त्यांनी 19 ऑक्टोबर २०२१ रोजी या लसीचा दुसरा डोस घेतल्याचा मेसेज प्राप्त झाला आणि मृताचे कुटुंबीय देखील या प्रकाराने अचंबित झाले.

लसीकरणाची संख्या वाढवण्याचा तर हा प्रकार नाही ना ? अशी देखील चर्चा गावात सुरू झालेली आहे. परिसरातील बन्सीलाल धनराळे ( वय 66 ) यांनी दहा मार्च २०२१ रोजी लसीकरणाचा पहिला डोस घेतला होता मात्र सहा एप्रिल २०२१ रोजी त्यांचे अल्पशा आजाराने निधन झाले.

त्यांच्या मृत्यूला सहा महिने पूर्ण झाल्यापर्यंत नंतर बन्सीलाल धनराळे यांना 19 ऑक्टोबर 2021 रोजी कोरोनाचा दुसरा डोस घेतल्याचा मेसेज त्यांच्या मोबाईलवर आला. त्यांचा मुलगा विनोद धनराळे यांनी मेसेज वरुन लसीकरणाचे प्रमाणपत्र डाऊनलोड करून घेतले असता त्यावर दोन्ही डोस घेतल्याच्या तारखा नमूद आहेत. दुसरा डोस त्यांनी मालपुर प्राथमिक आरोग्य केंद्रात घेतल्याचे नमूद झालेले असल्याने या केंद्राची चौकशी करण्याची गरज निर्माण झालेली आहे.


शेअर करा