महाराष्ट्र हादरला..प्रियकराकडून ‘ हवे ते ‘ मिळवण्यासाठी नवऱ्याला देत होती रोज थोडा थोडा मृत्यू

शेअर करा

महाराष्ट्रात एक धक्कादायक घटना उघडकीस आली असून प्रेमात अडसर ठरणाऱ्या पतीचा काटा तर काढायचा मात्र खून वाटू नये म्हणून एका पत्नीने चक्क पतीला रोज थोडे थोडे कीटकनाशक दिल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे .यवतमाळ जिल्ह्यातील ढाणकी जवळील सावळेश्वर येथील ही घटना असून आरोपी महिला ही आपल्या प्रियकराच्या मदतीने पतीला दररोज थोड्या थोड्या प्रमाणात दारू आणि अन्न-पाण्यातून कीटकनाशकांची मात्रा देत होती मात्र तरीदेखील पती मरत नसल्याचे लक्षात आल्यावर सदर पत्नीने आणि तिच्या प्रियकराने तिच्या पतीची गळा आवळून हत्या केली.

उपलब्ध माहितीनुसार, भीमराव काळबांडे असं हत्या झालेल्या दुर्दैवी पतीचं नाव आहे. मृत भीमराव गेल्या एक ते दीड वर्षांपासून आपल्या पत्नीसह सावळेश्वर येथे वास्तव्याला होते . याचदरम्यान भीमरावच्या पत्नीचं त्याच्याच नात्यातील अनिरुद्ध काळबांडे याच्यासोबत अनैतिक संबंध जुळले आणि त्यांनी सर्व मर्यादा पार केल्या. एके दिवशी अचानकपणे पतीला याबद्दल माहिती झाली आणि त्यांच्यात वाद सुरु झाले.

संतापलेल्या भीमराव याने आपल्या पत्नीला काही दिवसांसाठी माहेरी पाठवले मात्र तरीदेखील ती आणि तिचा प्रियकर यांच्यात सगळं सुरूच होत. भीमराव तिला नांदवण्यास तयार नसताना देखील नातेवाईकांनी मध्यस्थी करत दोघांमध्ये समेट घडवून आणला आणि ती पुन्हा पतीकडे आली मात्र आल्यावर तिने आणि तिच्या प्रियकराने पतीला मारण्यासाठी एक भयानक प्लॅन रचला. आरोपी पत्नीनं दारूचं व्यसन असणाऱ्या भीमरावला दारू, पिण्याचं पाणी आणि अन्नातून दररोज कीटकनाशकांची मात्रा देण्यास सुरुवात केली, याने तो हळू हळू मरेल आणि त्यानंतर आपल्यावर काही बालंट येणार नाही असा या महिलेचा अंदाज होता.

पत्नीने हळूहळू भीमराव याच्या खाण्यात , पाण्यात आणि दारूत कीटकनाशक देण्यास सुरुवात केली आणि त्याची प्रकृती बिघडू लागली. भीमराव रुग्णालयात दाखल झाला तर सगळाच प्लॅन चौपट होईल या भीतीने आरोपी पत्नीने घटनेच्या दिवशी भीमरावला जास्त प्रमाणात कीटकनाशकांची मात्रा दिली मात्र तरीही भीमरावचा मृत्यू झाला नाही म्हणून पत्नीने आणि तिच्या प्रियकराने शेवटी भीमरावची गळा आवळून हत्या केली. आरोपी महिलेनं आपल्या गुन्ह्याची कबुली दिली असून पुढील तपास पोलीस करत आहेत.


शेअर करा