नगर एमआयडीसीत कंपनीत दरोडा , चारचाकी वाहनातून आले अन त्यानंतर ..

शेअर करा

नगर शहरात व जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून गुन्हेगारीचे प्रमाण मोठ्या प्रमाणावर वाढले आहे. नागापूर एमआयडीसी येथील झेन इलेक्ट्रिक कंपनी मध्ये सुरक्षारक्षकावर लाकडी दांडे व लोखंडी टॉमिने हल्ला करून दरोडेखोरांनी चांदीचे मुलायम असलेल्या 17 लाख 50 हजार रुपयांच्या कॉपरच्या पट्ट्या चोरून नेल्या आहेत. शुक्रवारी पहाटे ही घटना उघडकीस आली आहे. या घटनेनंतर परिसरातील इतर उद्योजकांमध्ये देखील भीतीचे वातावरण निर्माण झाले असून परिसरात खळबळ उडालेली आहे.

एमआयडीसी पोलिस ठाण्यात कंपनीचे व्यवस्थापक शिवाजी भागाजी कुदनर यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, सहा ते सात जणांच्या विरोधात दरोड्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे या घटनेत सोन्याबापु विजय पळसकर व विलास परसराम नेवसे हे दोन सुरक्षारक्षक देखील जखमी झालेले आहेत.

शुक्रवारी रात्री सुरक्षासुरक्षा पळसकर व नेवसे हे कंपनीमध्ये ड्युटीवर असताना चारचाकी वाहनातून दरोडेखोर आले आणि त्यांनी सुरक्षारक्षकांना मारहाण करीत कंपनीचे लॉक तोडले तसेच कंपनीमधील सीसीटीव्ही फोडून चोरी केली. या घटनेची माहिती मिळाल्यानंतर अप्पर पोलीस अधीक्षक सौरभ अग्रवाल, जिल्हा उपाध्यक्ष अजित पाटील, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अनिल कटके व एमआयडीसीचे निरीक्षक युवराज आठरे यांनी घटनास्थळी भेट दिली असून तपास सुरु असल्याचे समजते.


शेअर करा