कांदे लावायला म्हणून आली आणि ड्रायव्हरसोबत फरार झाली , पुण्यातून आणले धरून

शेअर करा

महाराष्ट्रात अनेक धक्कादायक घटना उघडकीस येत असून अशीच एक घटना बीड जिल्ह्यातील कडा येथे उघडकीस आली आहे. कांदा लागवडीसाठी आलेल्या 15 वर्षीय अल्पवयीन मुलीला वाहन चालकाने फूस लावून पळविले. आंभोरा ठाण्यात ही घटना घडली होती. अखेर अठरा दिवसानंतर गुरुवारी सदर मुलगी ही सापडली असून पुण्याजवळील लोणीकाळभोर परिसरातून त्यांना ताब्यात घेण्यात आले आहे. अपहरण झाल्यानंतर तिच्यावर अत्याचार झाल्याची देखील घटना समोर आली.

उपलब्ध माहितीनुसार, राम अंबादास काशीद ( राहणार पाटण सांगवी तालुका आष्टी ) असे या आरोपीचे नाव असून हा वाहन चालक म्हणून मजुरांची ने-आण करतो. याच दरम्यान या आरोपीची पीडित मुलीशी ओळख झाली आणि आणि रामाने तिला तीन ऑक्टोबर रोजी फूस लावून पळवून नेले. त्याच्या सोबत पळून गेल्यानंतर ते दोघे एकोणीस दिवस सोबत राहिले. याच दरम्यान राम काशीद याने तिच्या सोबत बळजबरीने अत्याचार केला.

दुसरीकडे मुलीचे आई-वडील व नातेवाईक तिचा शोध घेत होते. दोन दिवस मुलीचा शोध घेऊनही ती सापडली नाही, त्यानंतर राम काशीद यानेच त्या मुलीला पळवून नेले असून त्यासाठी त्याला त्याची मावशी सुषमा धनंजय देशमुख ( राहणार धामणगाव ) तिने देखील प्रोत्साहन दिले असल्याची बाब समोर आली. पीडित मुलीच्या वडिलांच्या तक्रारीवरून या दोघांच्या विरोधात अपहरणाचा गुन्हा नोंदवण्यात आला होता. पोलिस तपास सुरू झाला आणि पुण्याजवळील लोणी काळभोर काळभोर येथून या दोघांना ताब्यात घेण्यात आले.


शेअर करा