यवतमाळकर महिलेच्या गोड आवाजाने डॉक्टरला ‘ याड ‘ लागलं , प्रकरणात मोठा ‘ ट्विस्ट ‘

शेअर करा

काही दिवसांपूर्वी यवतमाळ येथे एका तरुणाने दिल्ली येथील उच्चभ्रू डॉक्टरला महिला असल्याचे सांगत गंडा घातला होता मात्र या युवकाला त्याचा पश्चाताप झाला आणि त्याने आत्महत्येचे टोकाचे पाऊल उचलल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. संदेश मानकर ( वय एकवीस )असे या युवकाचे नाव असून आपल्या डॉक्टर मित्राला दोन कोटी रुपयांना आपण फसवले याचे शल्य त्याच्या मनात राहिले होते, त्यातून त्याने आत्महत्या केली.

उपलब्ध माहितीनुसार, संदेश मानकर याने हायप्रोफाईल महिलेच्या नावाने फेसबुकवर अकाउंट बनवून अनेक मित्र जोडले होते. मात्र आर्थिक अडचणीत आल्यानंतर त्याने याचा फायदा उचलत दिल्ली येथील एका शल्यचिकित्सकाला दोन कोटी रुपयांचा गंडा घातला होता. दुर्दैवी बाब म्हणजे आई-वडिलांच्या निधनानंतर संदेश अनिल मानकर हा एकाकी आयुष्य जगत होता . भाड्याच्या घरात राहत होता आणि त्यातूनच त्याने सोशल मीडियाला आपले मित्र बनवले आणि त्यातून आपले मैत्रीपूर्ण विश्व तयार केले होते.

असे सगळे सुरू असताना दिल्ली येथील एक शल्यचिकित्सक संदेश मानकर यांच्या संपर्कात आला आणि त्याने संदेश याच्याशी महिला समजून मैत्री केली होती. संदेश याने त्याचा गैरफायदा घेत अडचणीत असल्याचे सांगत या शल्यचिकित्सकाकडून तब्बल दोन कोटी रुपयांची मदत घेतली होती, मात्र पुढे हे प्रकरण पोलिसात गेले आणि संदेश मानकर याला अटक देखील करण्यात आली होती. झालेल्या कृत्याचा पश्चाताप झाल्याने संदेश मानकर याने आत्महत्या केल्याची बाब समोर आली आहे.


शेअर करा