नागपूर हादरले..अल्पवयीन मुलगी ‘ पाचवा ‘ महिना सुरु होईपर्यंत बोललीच नाही अन ..

शेअर करा

महाराष्ट्र्रात अनेक धक्कादायक घटना उघडकीस येत असून अशीच एक घटना नागपूर इथे घडलेली आहे . फक्त १६ वर्षे वय असलेल्या एका मुलीने एका गोंडस मुलीला जन्म दिला असून तिला वयाच्या १४ व्या वर्षीच एका युवकाने प्रेमाच्या जाळ्यात ओढले होते. तिच्यावर सातत्याने तो अत्याचार करत होता त्यातून मुलीला गर्भधारणा झाली. एमआयडीसी पोलिसांनी मुलीच्या प्रियकराविरूद्ध बलात्काराचा गुन्हा दाखल केला असून संदीप रामू पंचेश्‍वर (२१, रा. एकात्मतानगर) असे अटक करण्यात आलेल्या प्रियकराचे नाव आहे.

उपलब्ध माहितीनुसार , १६ वर्षीय मुलगी रिया (बदललेले नाव) आणि आरोपी संदीप पंचेश्‍वर हे दोघेही एमआयडीसीत एका परिसरात होते . रियाचे आई-बहिण मोलमजुरी करत असल्याने रिया हिने देखील शिक्षण सोडून दिले आणि आईला कामाला हातभार लावत होती. संदीप हा ॲल्युमिनियमच्या खिडक्या बनविण्याचा ठेकेदार असून तो देखील याच परिसरात राहतो. दरम्यान त्यांच्यात सूत जुळले आणि रियाच्या घरी कुणी नसल्याची संधी साधत तो तिची आई आणि बहीण नसताना तिच्या घरी जाऊ लागला.

२०२० मध्ये मुलीची आई आणि बहीण कामावर गेली असताना संदीप तिच्या घरी आला आणि तिच्यावर बळजबरी बलात्कार केला. पुढे हा प्रकार नित्याचा झाला आणि त्यातून फेब्रुवारी २०२१ मध्ये रियाला दिवस देखील गेले मात्र पाच महिन्याची ती गरोदर असताना तिने ही माहिती आपल्या बहिणीला दिली मात्र डॉक्टरांनी उशीर झाल्याचे सांगून गर्भपात करण्यास नकार दिला.

१७ ऑक्टोबर रोजी रियाच्या पोटात दुखू लागले म्हणून तिला वानडोंगरी येथील शालिनीताई मेघे रुग्णालयात भरती करण्यात आले अन त्याचदिवशी तिने एका मुलीला जन्म दिला. डॉक्टरांनी पाठविलेल्या अहवालावरून शेवटी एमआयडीसी पोलिसांनी आरोपी संदीपवर बलात्कार आणि पोक्सोचा गुन्हा दाखल करून त्याला अटक केली.


शेअर करा