‘ तुझ्या किडन्या विकून पैसे वसूल करणार ‘, जिमच्या मालकाचा पैशांचा माज अन त्यानंतर ..

शेअर करा

महाराष्ट्रात एक धक्कादायक घटना समोर आली असून काम वेळेत व्हावे म्हणून कंत्राटदारास चक्क डांबून ठेवण्यात आले मात्र त्यानंतर या कंत्राटदाराचा मृतदेह आढळून आला . कंत्राटदाराच्या या मृत्यूविषयी तर्क वितर्क लढवले जात असून कल्याण येथील या घटनेने परिसरात खळबळ उडालेली आहे. आरोपीने फर्निचर बनवणाऱ्या तीन मजुरांना 24 तास जीममध्ये डांबून ठेवले होते आणि दिवाळीच्या आधी फर्निचर न तयार झाल्यास तुझ्या किडन्या विकून पैसे वसूल करु, असा दम आरोपीने मृतक फर्निचर कंत्राटदाराला दिला होता. आरोपीचं नाव वैभव परब असं असून आत्महत्या करणाऱ्या पीडित कंत्राटदाराचं पुनमाराम चौधरी असं नाव आहे. कल्याणच्या कोळसेवाडी पोलिसांनी तातडीने आरोपी वैभव परब विरोधात गुन्हा दाखल करत बेड्या ठोकल्या आहेत.

काय आहे प्रकरण ?

कल्याण पूर्व भागातील तिसगाव नाका परिसरात फिटनेस एम्पायर या जीमचे काम सुरु आहे. जीमचा मालक वैभव परब आणि त्याच्या पार्टनरची इच्छा होती दिवाळीच्या शुभ मुहूर्तावर जिम सुरु झाली पाहीजे. जीम मालक परबने फर्निचर तयार करण्याचे काम पुनमाराम चौधरी या कंत्राटदाराला दिले होते. पुनमाराम चौधरी यांनी कामासाठी काही मजूर त्या ठिकाणी लावले होते मात्र त्यांच्याकडून कामात दिरंगाई होत असल्याचा आरोपीला वाटत होते .

18 ऑक्टोबरला जेव्हा मजूर राकेश कुमार, गोगा राम आणि सोलाराम हे जीममध्ये काम करण्यास गेले तेव्हा परबने या तिघा मजुरांना तिथेच उपाशीपोटी २४ तास डांबून ठेवले. दुसऱ्या दिवशी त्यांचा कंत्राटदार पुनमाराम चौधरी आल्यावर जीम मालक वैभव परब आला आणि त्याने कंत्राटदार पुनमाराम चौधरीला मारहाण केली. ‘ तुला जे आगाऊ पैसे दिले आहेत, काम झाले नाही तर तुझी किडणी विकून तुझ्याकडून पैसे वसूल करणार ‘ असं आरोपी म्हणाला. झालेल्या वादावादीनंतर चौधरी यांनी मजुरांना दुसरीकडे पाठवून दिले आणि एकट्याने काम सुरु केले मात्र 19 तारखेला त्याचा मृतदेह जीममध्ये गळफास घेतलेल्या अवस्थेत सापडला.

पुनमाराम चौधरी यांचे कुटुंबीय कोळसेवाडी पोलीस ठाण्यात पोहचले असून संपूर्ण प्रकरणाचा संपूर्ण तपास झाला पाहीजे, अशी मागणी त्यांनी केली आहे. .आत्महत्येस प्रवृत्त केल्याच्या आरोपाखाली वैभव परबच्या विरोधात गुन्हा दाखल करुन त्याला ताब्यात घेण्यात आले आहे मात्र यात पुनमाराम चौधरी यांनी आत्महत्याच केली की इतरही ? याची चौकशी सुरु आहे. आत्महत्या केल्याची प्राथमिक माहिती समोर आल्याने हा गुन्हा दाखल केल्याचे वरिष्ठ पोलिस निरिक्षक बशीर शेख यांनी सांगितले असून तपास सुरु असल्याचे समजते.


शेअर करा