महाराष्ट्र हादरला..विवाहित महिला प्रियकरासोबत पळाली मात्र ‘ एकाच महिन्यात ‘ घडले असे की ?

शेअर करा

महाराष्ट्रात एक धक्कादायक घटना उघडकीस आली असून बुलडाणा येथील एक विवाहित महिला प्रियकरासोबत पळाली. त्याच्यासोबत एक महिना मुंबईत राहिली देखील मात्र अचानक एका दिवशी राहत्या घरी दोघांनीही गळफास घेऊन आपलं जीवन संपवलं. त्याच्या अशा अचानक जाण्याने अनेक शंका व्यक्त केल्या जात आहेत .

काय आहे नेमकं प्रकरण ?

बुलडाणा जिल्ह्याच्या मलकापूर तालुक्यातील देवधाबा येथील 24 वर्षीय विवाहिता शीतल सपकाळ ही पती आणि पोटच्या दोन मुलांना सोडून गावातीलच तिच्या प्रियकरासोबत महिनाभरापूर्वी पळून गेली होती. बायकोच पळून गेल्याने तिच्या सासरच्या लोकांवर तोंड दडवण्याची पाळी आली होती मात्र तिचा शोध लागत नव्हता. दरम्यानच्या काळात ती आणि तिचा प्रियकर यांनी मुंबईमधील भांडुपच्या रामनगर परिसरात पती-पत्नी म्हणून भाड्याने एक रूम मिळवली आणि तिथे राहणे सुरु केले मात्र 21 ऑक्टोबरला दोघांनी राहत्या घरातच गळफास घेऊन जीवनयात्रा संपविली.

धक्कादायक बाब म्हणजे मृतक विवाहिता शीतल हिला चार आणि सहा वर्षाची दोन मुले असून प्रियकराच्या नादात ती इतकी आंधळी झाली होती की तिने जाताना कोणताच मागचा पुढचा विचार केला नाही. शीतल हरवल्याची तक्रार मलकापूर पोलीस स्टेशनला देण्यात आलेली होती मात्र पोलिसांचा तपास सुरु असतानाच त्यांच्या आत्महत्येचे वृत्त समोर आले. एक महिन्याच्या आत असं काय घडलं की दोघांनीही गळफास घेतला यावरून गावात तर्क वितर्क लढवले जात आहेत.


शेअर करा