प्रियकराकडून दोन मुले झाल्यावर म्हणाली ‘ आता तू म्हातारा झालाय ‘, बहीण भावासारखे राहू

शेअर करा

प्रेयसीच्या नादाला लागून जिच्यासाठी बायको मुलांना सोडले अन चार एकर जमीन विकली. तिने फक्त दहा वर्षे सोबत राहिल्यानंतर म्हातारा झाल्याचे सांगून दुसरा प्रियकर पकडला, त्यामुळे संतापलेल्या माजी प्रियकराने तिला गोड बोलून शिवारात नेऊन मारून टाकले अन त्यानंतर तिचे प्रेत विहिरीत टाकून दिले. औरंगाबाद जिल्ह्यात ही घटना उघडकीस आली असून आरोपीस जेरबंद केल्यानंतर त्याने या गोष्टीची कबुली दिली आहे. मारिया सुरेश आल्हट नामक महिलेची हत्या वाळूज परिसरात झाली होती त्यानंतर पोलीस तपास सुरु झाला.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ‘ मारियाच्या पतीचे १२ वर्षांपूर्वी निधन झाले होते. तिला पतीपासून एक मुलगी होती. याचदरम्यान ती आरोपी सुनिल खरात याच्या संपर्कात आली. सुनीलच्या संपर्कात आल्यानंतर दोघे दहा वर्षांपासून पती-पत्नीसारखे रहायला लागले. मारियाच्या नादात सुनील पूर्ण वेडा झाला आणि तिच्यासाठी सुनीलने पत्नी, मुलांना सोडून दिले व स्वतःची चार एकर जमीन देखील विकून टाकली.

मारियाला सुनीलपासून दोन मुले झाली होती तरीही ती काही दिवसांपासून त्याच्यापासून दूर राहू लागली. आपण आता बहीण-भावासारखे राहू, तू म्हातारा झाला आहेस, असे ती सातत्याने त्याला हिणवत होती. दरम्यान मारिया हिचे एका ठेकेदारासोबत सूत जुळले असल्याची माहिती सुनीलला समजली. संतापलेल्या सुनीलने २३ सप्टेंबर रोजी तुला एकदाच भेटायचे आहे. यानंतर पुन्हा येणार नाही, असे सांगून तिला एकलहरा शिवारात नेले.

तिच्यावर तिथे अत्याचार केल्यानंतर मक्याच्या शेतातील चिखलात तोंड दाबून मारून टाकले आणि तिचे प्रेत विहिरीत टाकून दिले आणि तेथून फरार झाला. मारियाच्या पहिल्या पतीपासून झालेली मुलगी व सुनीलच्या पहिल्या पत्नीचा मुलगा हे दोघे देखील संगनमताने पळून गेले असून सुनीलपासून मारियाला झालेली सहा आणि अडीच वर्षांची दोन मुले मात्र उघड्यावर आली आहेत.

पोलीस आयुक्त डॉ. निखिल गुप्ता, उपायुक्त अपर्णा गिते यांच्या मार्गदर्शनाखाली निरीक्षक अविनाश आघाव, उपनिरीक्षक अमोल मस्के, सहायक फाैजदार सतीश जाधव, हवालदार सुधाकर मिसाळ, जितेंद्र ठाकूर, रवींद्र चरात, सुनील बेलकर, विजय पिंपळे आणि नितीन देशमुख यांच्या पथकाने उघडकीस आणला आहे . मारिया सुरेश आल्हट या महिलेची आत्महत्या नसून खून झाल्याचे समोर येताच मारियासोबत शेवटच्या वेळी कोण संपर्कात होते, याची पडताळणी करण्यात आली असता सुनील खरात याचे नाव समोर आले. चौकशीत त्याने उडवाउडवीची उत्तरे दिली मात्र पोलिसी खाक्या दाखवताच त्याने गुन्हा कबूल केला.


शेअर करा