देश हादरला.. ‘ वहिनीचे भावाच्या मित्रासोबत ‘ तसले ‘ संबंध होते म्हणून हे घडलंय ‘

शेअर करा

देशात अनेक धक्कादायक घटना उघडकीस येत असून अशीच एक घटना मध्य प्रदेशात भोपाळ इथे उघडकीस आली आहे . आपल्या पत्नीचे विवाहबाह्य संबंध कळताच पतीने स्वतःच गळफास घेतला आणि आत्महत्या केली. त्यानंतर ही घटना कळल्यानंतर दुःख असह्य झालेल्या पत्नीनं स्वतःला देखील पेटवून घेत आपलं आयुष्य संपवलं.

उपलब्ध माहितीनुसार, मध्य प्रदेशातील भोपाळमध्ये राहणाऱ्या अक्षय सोमकुंवर यांचं काही वर्षांपूर्वी सुधाशी लग्न झालं होतं. दोघांना चार वर्षांचा मुलगादेखील आहे. अक्षय रात्री कामानिमित्त बाहेर राहत असल्याने पत्नीचे पतीच्या मित्रांसोबत प्रेमसंबंध सुरु झाले होते. लिफ्टमन म्हणून काम करणाऱ्या अक्षय यांना गेल्या काही दिवसांपूर्वी आपल्या पत्नीच्या विवाहबाह्य प्रेमसंबंधांबाबत माहिती समजली होती आणि ते हताश झाले होते.

अक्षय यांनी राहत्या घरात ओढणीने गळफास घेतलेला पाहून त्यांच्या आईने आरडाओरडा करत शेजाऱ्यांना बोलावून घेतलं आणि अक्षयला रुग्णालयात नेण्यात आलं मात्र डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केलं.पतीनं आत्महत्या केल्याचं लक्षात आल्यावर पत्नी सुधानेही स्वतःला पेटवून घेतलं आणि त्यात तिचा अंत झाला. आपल्यासोबत 4 वर्षांच्या मुलालाही पेटवण्याचा तिने प्रयत्न केला मात्र सुदैवाने त्याला वाचवण्यात यश आले.

अक्षयचा भाऊ निलेश याच्या म्हणण्यानुसार, ‘ अक्षयचा मित्र सागर याने दगा देत अक्षयच्या बायकोशी प्रेमसंबंध निर्माण केले होते.सागर आणि सुधा यांचे काही दिवसांपासून प्रेमसंबंध होते त्यानंतर सुधा चक्क आपल्या पतीला सोडून सागरसोबत राहायला गेली होती. या घटनेनं व्याकूळ असलेल्या अक्षयनं आत्महत्येचं पाऊल उचललं ‘


शेअर करा