औरंगाबाद हादरले…रात्री सिकंदर तिच्या घरात घुसायचा मात्र ‘ त्या ‘ दिवशी झाले असे की

शेअर करा

औरंगाबाद इथे एक वेगळीच घटना उघडकीस आली असून एका प्रियकराने चक्क प्रेयसीच्या घरीच घरफोडी केल्याची धक्कादायक घटना घडली आहे अर्थात त्यामागचे कारण ऐकून पोलिसही चकित झाले आहेत.प्रेयसी सतत लग्न करण्याचा तगादा लावते म्हणून तिला धडा शिकवण्यासाठी प्रियकराने तिच्या घरी घरफोडी केली .औरंगाबाद शहरातील जिन्सी पोलीस स्टेशन हद्दीत आठ दिवसांपूर्वी ही घटना घडली होती. सदर प्रियकराचे अथवा चोराचे नाव सिकंदर असल्याचे समजते.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, 22 ऑक्टोबर रोजी न्यू बायजीपुरा येथे एका 35 वर्षीय महिलेचे घर फोडले होते. पोलिसात गुन्हा दाखल झाल्यावर तपास अधिकारी व्यंकटेश केंद्रे, उपनिरीक्षक गोकूळ ठाकूर यांना खबऱ्याकडून या महिलेच्या घरी रिक्षाचालक सिकंदर खान सतत येत असल्याची माहिती मिळाली. पोलिसांनी सिकंदरला शोधले आणि चौकशीसाठी ठाण्यात आणले.सुरुवातीला त्याने आढेवेढे घेतले मात्र पोलिसी खाक्या दाखवताच त्याने गुन्हा कबूल केला.

गुन्हा कबूल केल्यानंतर सिकंदर याने आणखी धक्कादायक खुलासा करताना सदर महिला व तो यांच्यात दोन वर्षांपासून प्रेमप्रकरण होते. फिर्यादी महिला ही त्याच्याकडे सतत लग्नासाठी तगादा लावत होती मात्र सिकंदर विवाहित असल्याने त्याचा लग्नाला नकार होता. तिच्या घरात घरफोडी केल्यास काही काळ का होईना ती लग्नाचा तगादा करणार नाही, असा त्याचा अंदाज होता म्हणून चक्क त्याने तिच्याच घरावर डल्ला मारला.

22 ऑक्टोबरला सिकंदरनेच फिर्यादी महिलेला तिच्या आईकडे सोडले आणि आता मी पण गावी चाललोय असे सांगितले मात्र तो तसाच प्रेयसीच्या घरी गेला अन त्याने 57 हजार रुपयांवर डल्ला मारला . प्रेयसीला तो असे काही करू शकेल याचा अंदाजही आला नाही अन तिने देखील त्याच्यावर संशय व्यक्त देखील केला नाही मात्र पोलिसांनी सूत्रे फिरवत त्याला जेरबंद करत या धक्कादायक गुन्ह्याची उकल केली.


शेअर करा