पोलिस प्रियकराचा प्रेयसीच्या मामाच्या घरी जाऊन ‘ भलताच ‘ आग्रह , प्रकरण पोलिसात

शेअर करा

महाराष्ट्रात अनेक धक्कादायक घटना उघडकीस येत असून अशीच एक घटना नंदुरबार जिल्ह्यात समोर आलेली आहे. विशेष म्हणजे या गुन्ह्यातील आरोपी हा महाराष्ट्र पोलीस दलात कार्यरत असून त्याच्या या कृत्याने पोलीस दलाची देखील मान खाली गेली आहे.

उपलब्ध माहितीनुसार, शिक्षिका असलेल्या प्रेयसीला जबरदस्तीने सोबत येण्यास सांगत न आल्यास आत्महत्या करण्याची धमकी हा देत होता. त्याच्या प्रेयसीने दिलेल्या फिर्यादीनुसार, सांगरखेडा पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शहादा तालुक्यातील अनरुद येथे हा प्रकार घडला आहे.

शहादा तालुक्यातील एका जिल्हा परिषद शाळेत शिक्षिका असलेल्या महिलेचे नंदुरबार उपनगर पोलीस ठाण्यातील कर्मचारी रवींद्र शिरसाट याच्यासोबत प्रेमसंबंध होते. त्यातून तो वारंवार या महिलेला आपल्यासोबत चलण्यास सांगत होता मात्र महिला त्याला नकार देत होती. त्यामुळे तो या महिन्यात मामाच्या गावी पोहोचला आणि तिथे येऊन तिला आपल्या सोबत चालण्याचा आग्रह करत होता, त्यावेळी त्याने तिथे चांगलाच गोंधळ घातला म्हणून घाबरलेल्या या प्रेयसीने सांगरखेडा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.


शेअर करा