नायजेरियन नव्हे तर भारतीयच ? प्रियकराला मारण्यासाठी प्रेयसीने ओलांडल्या सगळ्या मर्यादा

शेअर करा

देशात अनेक धक्कादायक घटना समोर येत असतानाच अशीच एक घटना हरयाणाच्या फरिदाबादमध्ये उघडकीस आली आहे. नायजेरियन व्यक्तीची हत्या झाल्याचा संशय पोलिसांना आला मात्र तो व्यक्ती चक्क भारतीय निघाला आणि त्याच्या हत्येचे कारण समजताच पोलीस देखील चकित झाले. मयत व्यक्तीचे नाव पवन असे असून तो एका विवाहित महिलेसोबत २ वर्षांपासून लिव इनमध्ये राहत होता. त्यांच्यातील वादानंतर महिलेनं पेट्रोल टाकून पवनला जिवंत जाळल असून सेक्टर-६५ क्राईम ब्रांचनं आरोपी महिलेला अटक केली आहे

उपलब्ध माहितीनुसार , सदर आरोपी महिला ही मूळची पंजाबच्या पठाणकोटची रहिवासी असून तिच्या पतीचे निधन झालेले आहे .फरिदाबाद इथे पतीच्या जागी नोकरीला लागल्यावर तिचे त्याच कंपनीत पवन याच्यासोबत सूत जुळले आणि ते दोघे सोबत राहू लागले. या महिलेच्या मुली पंजाबमध्ये राहत होत्या. २०१९ पासून ते लिव्ह इनमध्ये राहत होते.महिलेची १४ वर्षांची मोठी मुलगी आईसोबत राहण्यासाठी बल्लभगढला आली त्यावेळी आरोपी पवन याने तिच्यासोबत छेडछाड़ केली त्यावरून महिलेचं आणि पवनचं भांडण झालं आणि महिलेने त्याला संपवण्याचा निर्णय घेतला.

महिला पवनसोबत १६ ऑक्टोबरला त्याच्या कारमध्ये दिल्लीला गेली आणि आपल्या ओळखीच्या व्यक्तीला बोलावून त्याची कार घरी नेण्यास सांगितलं. महिलेनं पवनसोबत येण्याच्या वेळीच बल्लभगढहून २ लीटर पेट्रोल आणि झोपेच्या गोळ्या खरेदी केल्या होत्या त्या तिने गोड बोलून पवनला खाऊ घातल्या आणि तो धुंदीत असतानाच त्याला रिक्षातून फरिदाबादला घेऊन गेली आणि सेक्टर-७५ मध्ये एका निर्जनस्थळी पवनच्या अंगावर पेट्रोल टाकलं आणि त्याला पेटवून दिलं.


१७ ऑक्टोबरला पोलिसांना मृतदेह सापडला मात्र शरीरयष्टी पाहून तो नायजेरियन असावा असा अंदाज आला मात्र नायजेरियन व्यक्तींना बोलावून पोलिसांनी मृतदेहाची ओळख पटवण्याचा प्रयत्न केला मात्र त्यात अपयश आल्यावर पोलिसांनी पुढे तपास सुरु केला आणि हा धक्कादायक प्रकार उघडकीस आला.


शेअर करा