नगर ब्रेकिंग..विनयभंगाचा गुन्हा मागे घेण्यासाठी आरोपी महिलेच्या घरात घुसला अन ..

शेअर करा

महाराष्ट्रात अनेक धक्कादायक घटना गेल्या काही दिवसात उघडकीस येत असून अशीच एक घटना नगर तालुक्यात उघडकीस आली आहे. आपल्यावर दाखल केलेला विनयभंगाचा गुन्हा मागे घेण्यासाठी आरोपीने सदर महिलेवर रिव्हॉल्वर रोखून तिला जीवे मारण्याची धमकी दिली. नगर तालुक्यातील पाथर्डी रोडवरील एका गावामध्ये शनिवारी रात्री साडेआठ वाजता ही घटना उघडकीस आली आहे, त्यानंतर पोलिसांनी आरोपीस अटक केली आहे.

उपलब्ध माहितीनुसार, मंगेश रामचंद्र घायतडक ( वय 39 राहणार भिंगार ) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. पीडित महिलेने घायतडक याच्याविरोधात दोन वर्षांपूर्वी विनयभंगाचा गुन्हा दाखल केला होता त्यानंतर हा गुन्हा मागे घे मी असे सांगत आरोपी महिलेच्या घरी पोहोचला आणि तिथे गेल्यानंतर रिव्हॉल्वर काढून तिला व तिच्या नवऱ्याला जीवे मारण्याची धमकी दिली. सदर आरोपीच्या विरोधात जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.


शेअर करा