कोरोनाची अशीही भीती.. ‘ ह्या ‘ कारणावरून मित्राच्या डोक्यात बिअरची बाटली फोडली : कुठे घडली घटना ?

शेअर करा

कोरोना बरा होत असला तरी सातत्याने कोरोनाबद्दल दाखवण्यात येणारी भीती आणि कोरोना रुग्णावर होत असलेला सामाजिक बहिष्कार याने कोरोना रुग्ण धास्तावलेले असल्याने बहुतांश लोक कोरोना झालाय किंवा होमक्वारंटाइन केलेले व्यक्ती आपली माहिती दडवून ठेवतात. मात्र अशीच एका मित्राला कोरोना झाल्याची माहिती दुसऱ्या मित्राने त्याच्या नातेवाईकांना दिली आणि त्यानंतर होम क्वारंटाइन झालेल्या मित्राचा राग अनावर झाला. करोना झाल्याची माहिती नातेवाइकांना ‘ का दिली ” असे विचारात एका होम क्वारंटाइन रुग्णाने आपल्या मित्राच्या डोक्यात बिअरची बाटली फोडली आणि त्यानंतर त्याला दगडाने मारहाण केली

पुण्यातील विश्रांतवाडी परिसरात ही घटना घडली. या प्रकरणी शुभम सुरेंद्र प्रसाद (२३, रा. शांतीनगर, येरवडा) याने तक्रार दिली आहे. शुभम याने सदर माहिती दिली किंवा नाही यावर खुलासा झाला नसला तरी शुभम घरी जात असताना आरोपी तेथे आला. तक्रारदार शुभमने आपल्याला करोना झाल्याची माहिती नातेवाइकांना दिल्याचा गैरसमज त्याने करून घेतला. शुभम दिसताच आरोपीने त्याला शिवीगाळ करण्यास सुरुवात केली आणि रागाच्या भरात त्याने आपल्या हातातील बिअरची बाटली तक्रारदाराच्या डोक्‍यात फोडली.

आरोपीला कोरोना झाला होता मात्र १२ जुलैपर्यंत रुग्णालयात त्याच्यावर उपचार करण्यात आले. त्यानंतर त्याला जिल्हा प्रशासनाकडून होम क्वारंटाइन करण्यात आले आहे. त्याचा होम क्वारंटाइनचा कालावधी संपल्यानंतर त्याला पोलिसांकडून ताब्यात घेतले जाईल, अशी माहिती पोलिस अधिकाऱ्यांनी दिली. या प्रकरणाचा अधिक तपास विश्रांतवाडी पोलिस स्टेशनचे पोलिस उपनिरीक्षक प्रमोद चिंतामणी करीत आहेत.


शेअर करा