पुणे हादरले..पत्नीने पतीच्या कंपनीत घुसून त्याची बदनामी केली अन त्यानंतर..

शेअर करा

संसार म्हटले की भांडणेही आलीच मात्र पुणे इथे एक धक्कादायक घटना उघडकीस आली असून पत्नीच्या त्रासाला कंटाळून एका 33 वर्षीय तरुणाने आत्महत्या केली आहे. पत्नीने खोट्या तक्रारी करत नातेवाईकांमध्ये आणि कंपनीत बदनाम केली त्यातून हा तरुण नैराश्यात गेला आणि त्याने 29 सप्टेंबर रोजी विष प्राशन करून आत्महत्या केली. मृत तरुणाच्या भावाने वारजे पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली असून 28 वर्षीय महिलेविरोधात आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल केला आहे.

उपलब्ध माहितीनुसार, प्रकाश संभाजी चौघुले असं आत्महत्या करणाऱ्या 33 वर्षीय तरुणाचं नाव असून तो पुण्यातील वारजे परिसरातील रहिवासी आहे तर स्नेहल प्रकाश चौघुले असं गुन्हा दाखल झालेल्या आरोपी पत्नीचं नाव असल्याचे समजते. मयत प्रकाश याच्या भावाने केलेल्या तक्रारीनुसार, आरोपी पत्नी स्नेहल हिने मृत पती प्रकाश यांच्याविषयी खोट्या तक्रारी करत नातेवाईक आणि कंपनीमध्ये बदनामी केली होती. अशाच प्रकारे ती सातत्याने भावाला त्रास देत होती त्यामुळे तो वैतागला होता.

आरोपी पत्नीने सतत अपमानित करून प्रकाश याचं जगणं मुश्कील केलं होतं त्यामुळे त्याची मानसिक स्थिती बिघडली होती त्यातूनच पीडित पती प्रकाश याने 29 सप्टेंबर रोजी विष प्राशन केलं आणि त्यात त्याचा मृत्यू झाला.पोलिसांनी फिर्यादीच्या तक्रारीनुसार, आरोपी पत्नीविरोधात आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल केला आहे. या घटनेचा पुढील तपास पोलीस करत आहेत.


शेअर करा