पुणे हादरले..पतीसोबत पत्नी ‘ तसल्या ‘ अवस्थेत असताना अचानक प्रियकराचा कॉल आला अन..

शेअर करा

पुणे जिल्ह्यात गेल्या काही वर्षांपासून गुन्हेगारीचे प्रमाण चांगलेच वाढलेले पहायला मिळत आहे. अशीच एक धक्कादायक घटना पुणे परिसरात पिंपरी इथे उघडकीस आली असून आरोपी पतीनं पत्नीच्या प्रियकराचा मृतदेह हातभट्टीमध्ये टाळून जाळला आणि पोलिसांची दिशाभूल करण्यासाठी दृश्यम सिनेमाच्या स्टाईलनुसार परिस्थिती निर्माण करण्याचा प्रयत्न देखील केला मात्र त्याचा हा प्रयत्न फसला आणि त्याला जेरबंद करण्यात आले. पिंपरी चिंचवडमधील हिंजवडी पोलीस ठाणे हद्दीत येणाऱ्या बावधानमध्ये ही घटना उघडकीस आली आहे.

उपलब्ध माहितीनुसार, बावधन येथे राहणारा भरत चोरगे याचे एका महिलेसोबत अनैतिक संबंध होते. 21 ऑक्टोबर भरतनं महिलेला तिच्या मोबाईलवर दोन मिस कॉल दिले, त्यावेळी ती आपल्या पतीसोबत तसल्या अवस्थेत होती मात्र यामुळे महिलेचा पती चिडला आणि त्याने आपल्या पत्नीकडे विचारणा केली. आरोपी पतीनं महिलेला मारहाण करण्यास सुरुवात केली मात्र या महिलेनं घरातून पळ काढला.

महिला घरातून पळून बाहेर गेल्याने तिचा प्रियकर असलेला भरत चोरगे या महिलेला भेटण्यासाठी तिच्या घराजवळ आला मात्र भरत तिथे आल्याचं समजताच आरोपीनं आपल्या दोन साथीदारांच्या मदतीनं त्याची धारदार शस्त्रानं वार करत हत्या केली. हत्या केल्यानंतर आरोपीने त्याचा मृतदेह उरवडे गावात असलेल्या दारुच्या हातभट्टीमध्ये जाळला. मृतदेह जाळल्यानंतर त्याची राख आणि इतर अवशेष हे घोटावडे परिसरातल्या नाला आणि नदीत टाकून पुरावे नष्ट केले आणि त्यानंतर मध्य प्रदेशमध्ये पळून गेला.

दुसरीकडे भरत चोरगेच्या कुटुंबियांनी हिंजवडी पोलीस स्टेशनमध्ये तो बेपत्ता असल्याची तक्रार दाखल केली आणि त्याच दिवशी भरतची चप्पल त्याच्या आईला आरोपी लंकेश राजपूतच्या घराजवळ दिसली. हिंजवडी पोलिसांनी तपास सुरु करुन लंकेशला अटक केली असून त्याच्यासोबत गोल्या उर्फ अरुण राजपूत, सचिन तानाजी राजपूत यांनी अटक केली तर एका अल्पवयीन मुलाला ताब्यात घेतले आहे.


शेअर करा