कोरोना चाचणीसंदर्भात विखे पाटील मेमोरियल हॉस्पिटलची ‘ मोठी ‘ घोषणा : सुजय विखे यांचा व्हिडीओ

शेअर करा

नगर जिल्ह्यात कोरोना रुग्णसंख्या वेगाने वाढत असून कोरोना आटोक्यात येत नसल्याचे चित्र आहे. ह्याच पार्श्वभूमीवर नागरिकांच्या सुरक्षेसाठी डॉ. विठ्ठलराव विखे पाटील मेमोरियल हॉस्पिटल येथे कोविड तपासणी केंद्र उभारण्यात आले आहे.

कोरोना चाचणीसाठी आकारले जाणारे शुल्क शासनातर्फे नियमबद्ध केलेल्या दरांनुसारच आकारले जात आहे मात्र तरीदेखील अनेकांनी चाचणीसाठी आकारल्या जाणारे शुल्क अधिक असण्याबाबत अडचणी खासदार डॉ. सुजय विखे यांच्यासमोर मांडल्यामुळे आता कोरोना चाचणीसाठी विखे हॉस्पिटल इथे आकारण्यात येणाऱ्या शुल्कांमध्ये खालील प्रमाणे बदल करण्यात आला असून, हे सुधारित बदल आजपासून लागू करण्यात आले आहेत .

१० वर्षांपर्यंतच्या मुलांच्या चाचणीसाठी १,५०० रु. आणि ६० वर्षांहून अधिक वय असलेल्यांसाठी २,००० ₹. शुल्क आकारले जाणार आहे. मूळ शुल्क आणि सवलत शुल्क यातील फरक विखे पाटील परिवार व जनसेवा फाउंडेशनतर्फे भरला जाणार असल्याची माहिती खासदार सुजय विखे यांनी त्यांच्या फेसबुकवर एका व्हिडिओमधून दिली आहे तर वरील वयोगट वगळता इतर सर्व वयोगटातील व्यक्तींना पूर्वीप्रमाणे चाचणी शुल्क लागू असेल.


शेअर करा