‘ ..अन नवऱ्याला वाटतंय की त्याच्या कामामुळेच प्रोमोशन मिळतंय ‘, महिलेचा धक्कादायक खुलासा

शेअर करा

आपल्या पतीला मिळालेलं यश किंवा प्रमोशनचा आनंद अनेक महिला सोशल मीडियावर शेअर करतात मात्र एका महिलेने प्रोमोशन नामक गोष्टीबाबतचा आपला एक धक्कादायक अनुभव सोशल मीडियावर शेअर केला आहे .सदर महिलेनं तिच्या नवऱ्याला मिळणाऱ्या प्रमोशनमागचं जे कारण सांगितलं आहे ते वाचून तुम्हाला देखील आश्चर्य झाल्याशिवाय राहणार नाही .

महिलेच्या म्हणण्यानुसार , ‘ माझ्या पतीला वारंवार प्रमोशन मिळतं कारण त्याच्या बॉससोबत माझे लैंगिक संबंध आहेत मात्र हे प्रमोशन आपल्या कामामुळे मिळतं असंच माझ्या पतीला वाटतं,’ . महिलेच्या या धक्कादायक खुलाश्याने अनेक जणांच्या भुवया उंचावल्या आहेत. बॉसबरोबर आपले संबंध असल्यानेच कामात कमी असूनही आपल्या नवऱ्याला प्रमोशन दिलं जातं, असा दावा या महिलेनं केला आहे मात्र प्रकरण इतक्यावरच थांबलेलं नाही.

महिला पुढे म्हणते की, “ माझ्यासोबत पतीच्या बॉसचे अनेक दिवसांपासून लैंगिक संबंध आहेत. नवऱ्याचं प्रमोशन म्हणजे तो जास्त काळ घरापासून दूर असणे आणि यामुळेच मी त्याच्या बॉसशी संबंध ठेवू शकते,” असंही या महिलेनं पुढं लिहिलं आहे. प्रमोशनच्या नावाखाली पतीला आपल्यापासून दूर ठेवून त्याच्या बॉसशी संबंध ठेवणाऱ्या या महिलेच्या पोस्टवर लोकांच्या उलट सुलट प्रतिक्रिया येत आहेत.

सदर महिलेनं ट्विटरच्या Fesshole वर हे सगळं लिहिलं आहे. हे अकाउंट लोकांच्या गुप्त गोष्टी किंवा सिक्रेट्स किंवा केलेल्या चुकीची कबुली शेअर करण्यासाठी एक गोपनीय व्यासपीठ मानलं जातं. त्यामुळेच या अकाउंटवरून या महिलेनं हे सगळं लिहिलं आहे.


शेअर करा