घ्या अच्छे दिन..केंद्राच्या ‘ ह्या ‘ निर्णयाने ८० कोटी नागरिक होणार प्रभावित

शेअर करा

कोरोना महासाथीच्या कठीण काळात गरिबांची परवड होऊ नये यासाठी पंतप्रधान गरीब कल्याण योजना लागू करण्यात आली होती आणि त्याअंतर्गत देशभरातील ८० कोटी रेशन कार्डधारकांना मोफत अन्नधान्य वाटप करण्यात येत होते मात्र कोरोनाचे प्रमाण कमी होताच केंद्राने आपला हात आखडता घेतला असून मोफत अन्नधान्य वितरण उपक्रमाला ३० नोव्हेंबरनंतर मुदतवाढ न देण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे.

कोरोना साथीमुळे अनेक उद्योगधंदे बंद झाले अन कोट्यवधी लोक बेरोजगार झाले. त्यांच्यावर उपासमारीची वेळ येऊ नये म्हणून हा उपक्रम हाती घेण्यात आला होता मात्र आता अर्थव्यवस्थेत सुधारणा झाल्याचे कारण पुढे करत पूर्वीच्या काही निर्णयांत आता बदल करावे लागणार आहेत, असे केंद्रीय अन्न खात्याचे सचिव सुधांशू पांडे यांनी शनिवारी सांगितले आहे. गोरगरिबांना मोफत अन्नधान्य देण्याचा उपक्रम गेल्या वर्षीच्या मार्च महिन्यापासून सुरू झाला त्याला आता ३० नोव्हेंबरनंतर मुदतवाढ मिळणार नाही.

दुसरीकडे दिल्ली इथे मात्र गोरगरिबांना मोफत अन्नधान्य वितरित करण्याच्या योजनेस मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल सरकारने आणखी सहा महिन्यांची मुदतवाढ दिली आहे. पंतप्रधान गरीब कल्याण अन्न योजनेच्या अंतर्गत सुरू असलेल्या मोफत अन्नधान्य वाटप उपक्रमास मुदतवाढ न देण्याचे केंद्राने ठरविल्यानंतर दुसऱ्याच दिवशी केजरीवाल यांनी ही घोषणा केली असून दिल्लीकरांना मात्र या निर्णयाचा फायदा होणार आहे .


शेअर करा