पुण्यात खळबळ..पुरुषासोबत नेपाळी महिलेचा ‘ आक्षेपार्ह ‘ अवस्थेत मृतदेह , हत्या की आत्महत्या ?

शेअर करा

गेल्या काही वर्षांपासून पुण्यात गुन्हेगारीचे प्रमाण चांगलेच वाढलेले पहायला मिळत असून पोलिसांचा देखील कामाचा लोड मोठ्या प्रमाणात वाढलेला आहे . रविवारी दुपारी अशीच एक धक्कादायक घटना पुणे येथील मुंढवा परिसरात केशवनगर येथील कुंभारवाडा इथे उघडकीस आली असून एक पुरुष व एक महिला यांचे मृतदेह आक्षेपार्ह परिस्थितीत आढळून आले आहेत . ‘ हत्या आहे की आत्महत्या ‘ हे अद्याप स्पष्ट झालेले नसून पोलिसांनी दोन्ही शक्यता लक्षात ठेवून तपास सुरु केला आहे .

उपलब्ध माहितीनुसार , शरद भुजबळ (47, रा. कुंभारवाडा, केशवनगर, मुंढवा, पुणे ) आणि हेमा ( वय 43 राहणार नेपाळ ) अशी मयतांची नावे आहेत. शरद भुजबळ हा एनआयबीएम रोडवरील एका ट्रॅव्हलमध्ये ड्रायव्हर म्हणून काम करतो तर मयत हेमा हिच्याविषयी जास्त माहिती अद्याप हाती आलेली नाही. शरद याचा फोन लागत नसल्याने त्याचा मित्र परवेज आलम हा त्याच्या घरी गेला असताना हा धक्कादायक प्रकार लक्षात आला .

परवेज आलम हा घरी गेला तेव्हा घरातील गॅस चालू होता पण सिलेंडर संपलेले होते मात्र घराच्या शेजारी केमिकलचे कॅन आढळून आले तर शरद आणि हेमा यांच्या नाकातून रक्त आल्याचे देखील आढळून आले. शरद आणि हेमा यांचा मृत्यू नेमका कशामुळं झालाय हे अद्याप स्पष्ट झालेले नसल्याने परिसरात एकाच खळबळ उडालेली आहे . मुंढवा पोलिसांनी पंचनामा करत दोघांचेही मृतदेह शवविच्छेदनासाठी ससून रूग्णालयात पाठवले असून त्या रिपोर्टच्या आधारेच मृत्यूचे कारण स्पष्ट होणार असल्याचे सांगण्यात आले आहे .


शेअर करा