सोशल मीडियामुळे अनेक नवीन मित्र आणि मैत्रिणी देखील तयार होतात मात्र अनेकदा समोरचा व्यक्ती हा फारसा परिचयाचा नसल्याने प्रकरण वेगळ्याच वळणावर जाऊन थांबते . असाच एक प्रकार दिल्ली इथे उघडकीस आला असून फेसबुक फ्रेंड आधी फेसबुक चॅटिंगनंतर विवाहित महिलेशी मोबाईलवर तासंतास बोलू लागला होता आणि काही कालावधीनंतर महिलेला त्याच्या नुसते बोलत राहण्याचा कंटाळा येऊ लागला म्हणून तिने त्याच्यासोबत संपर्क कमी केला मात्र तो तरुण तिचा पिच्छा सोडायला तयारच नव्हता म्हणून महिलेने पतीला या प्रकाराची माहिती दिली आणि पतीने थेट त्याचे घर गाठले.
उपलब्ध माहितीनुसार , दिल्लीच्या भजनपुरा पोलीस ठाण्याच्या हददीत सदर महिला व तिचा पती राहत असून पतीचे वय हे ४८ वर्षे आहे. त्यांचा खाजगी शिकवणीचा व्यवसाय आहे . त्यांच्या पत्नीची सोशल मीडियावर भरत तोमर नावाच्या त्याच परिसरात राहणाऱ्या तरुणाशी ओळख झाली आणि ते तासंतास एकमेकांशी बोलू लागले.सुरुवातीला फेसबुक चॅटिंग आणि नंतर मोबाईलवर देखील ते एकमेकांच्या संपर्कात राहू लागले.
दरम्यान या प्रकाराची महिलेच्या पतीला बातमी समजली आणि त्यांच्यात वाद सुरु झाले. अखेर विवाहित महिलेने त्याच्याशी संपर्क तोडण्याचा निर्णय घेतला मात्र तो तरुण यासाठी तयार नव्हता. अखेर महिलेने हा प्रकार तिच्या पतीच्या कानी घातला आणि पतीने डायरेक्त्त या तरुणाचे घर गाठले. आधीच महिलेने बोलणे बंद केलेले आणि त्यात पुन्हा तिचा पती येऊन धमकावू लागल्याने भरत तोमरने महिलेच्या पतीवरच हल्ला केला अन त्याचे दोन दात तोडले आणि त्यानंतर आरोपी फरार झाला. महिलेच्या पतीला दवाखान्यात ऍडमिट करण्यात आले असून पत्नी त्याची काळजी घेत आहे.