नगर हादरले.. ‘ आत्ताच्या आता तू आळेफाट्याच्या लॉजवर ये ‘ नाहीतर..

शेअर करा

महाराष्ट्रात अनेक धक्कादायक घटना उघडकीस येत असून अशीच एक घटना नगर जिल्ह्यातील घारगाव येथे उघडकीस आली आहे. ग्रामीण भागातील एका युवतीचे फोटो काढून ते तिचे नातेवाईक आणि आई-वडिलांना दाखवेन आणि समाज माध्यमात वायरल करण्याची धमकी देत एका युवकाने संगमनेर तालुक्याच्या ग्रामीण भागात राहणाऱ्या बावीस वर्षीय युवतीवर अनेक वेळा अत्याचार केला. वारंवार त्याचा अत्याचार सहन केल्यानंतर त्याचा त्रास होऊ लागल्याने तिने पोलिस ठाण्यात सदर युवकाच्या विरोधात तक्रार दाखल केली आहे.

उपलब्ध माहितीनुसार, अतुल रावसाहेब कढणे ( राहणार घुलेवाडी तालुका संगमनेर ) असे गुन्हा दाखल झालेल्या युवकाचे नाव आहे. अतुल याने संगमनेर तालुक्याच्या ग्रामीण भागातील एका बावीस वर्षीय युवतीचे मोबाईलमध्ये फोटो काढले आणि आणि ते फोटो दाखवत तो तिला मोबाईलद्वारे व्हिडिओ कॉल करून बोलावून घ्यायचा आणि त्यानंतर गुंडांची टोळी आणून तुला आणि तुझ्या कुटुंबाला संपवून टाकेल, अशी धमकी देखील द्यायचा. त्याच्या धमक्यांना ती बळी पडली.

तिचे हे फोटो तिच्या नातेवाईकांना आणि आई-वडिलांना दाखवण्याची धमकी देत त्याने तिच्यावरती वारंवार अत्याचार केले. आळेफाटा तालुका जुन्नर जिल्हा पुणे येथील लॉजवर वेळोवेळी नेऊन त्याने तिच्यावर अत्याचार केले, असे पीडित मुलीने फिर्यादीत म्हटले आहे. घारगाव पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सुनील पाटील पुढील तपास करत आहे.


शेअर करा