देश हादरला..शिवसेनेकडून निवडणूक लढवलेल्या महिलेच्या घरातच ‘ सेक्स रॅकेट ‘ चा पर्दाफाश

शेअर करा

देशात अनेक धक्कादायक घटना समोर येत असतानाच अशीच एक घटना मध्य प्रदेशात समोर आली आहे .मध्य प्रदेशातील सिहोरमध्ये महिला शिवसेना नेत्या अनुपमा तिवारी यांच्या घरी सेक्स रॅकेटचा पर्दाफाश झाला असून त्यांच्या घरातून पोलिसांनी महिला मॅनेजर, तीन ग्राहकांसह सहा जणांना अटक केली आहे. आश्चर्याची गोष्ट म्हणजे या महिलेने शिवसेनेच्या तिकिटावर नगराध्यक्षपदाची पण निवडणूक लढवली असून अनुपमा तिवारी असे या महिलेचे नाव आहे.

पोलिसांना सेक्स रॅकेटची गुप्त माहिती मिळताच पोलीस सिहोर बसस्थानकाजवळ असलेल्या अनुपमा घरी पोहोचले. पोलिस आल्यानंतर तेथून कोणीही पळून जाण्यात यशस्वी झाले नाहीच मात्र अनेक जण आक्षेपार्ह आणि अवघडलेल्या अवस्थेत पकडले गेले. शिवसेना नेत्याच्या घरातून पोलिसांनी चार मुली आणि तीन ग्राहकांना अटक केली आणि तिथे काही अमली पदार्थही आढळून आले. पकडलेल्या सर्व मुली भोपाळ जवळच्या रहिवासी असल्याचे सांगण्यात येत आहे.

उपलब्ध माहितीनुसार, इंदुलता नावाची महिला मॅनेजर सर्व मुलींना शिवसेना नेत्याच्या घरी पोहचवत होती व ती महिला अन अनुपमा या दोघी मिळून ग्राहक देखील पोहचवत होत्या.पोलिसांनी शिवसेना नेत्याच्या घरातून २८ हजार रुपयांसह दोन कारही जप्त केल्या आहेत.महिला मॅनेजर इंदुलता या मुलींना घेऊन रुमवर यायची आणि अनुपमा तिवारी हिच्या मार्गदर्शनाखाली हा सर्व प्रकार चालायचा.

अनुपमा मूळची होशंगाबाद येथील रहिवासी असून अनुपमा तिवारीच्या पतीचं २०१८ मध्ये निधन झालं होतं. दारुबंदीविरोधातही अनुपमा मोहिम चालवायची. २०१५ निवडणुकीत अवघे ६९४ मते तिला मिळाली होती. सध्या पोलीस या संपूर्ण प्रकरणाची चौकशी करत आहेत. ज्यात आणखी खुलासा होण्याची शक्यता वर्तवली जात असून आणखी काही जणांना अटक होण्याची शक्यता असल्याचं पोलिसांनी सांगितले आहे.


शेअर करा