पतीला ‘ तसल्या ‘ अवस्थेत रंगेहाथ धरण्यासाठी बायकोने चेन्नईहून गाठली मुंबई अन पुढे ..

शेअर करा

महाराष्ट्रात अनेक धक्कादायक घटना उघडकीस येत असून अशीच एक घटना नवी मुंबईतील उरण येथे उघडकीस आली आहे. प्रॉपर्टीच्या वादातून पत्नी सोडून देऊन दुसऱ्या महिलेसोबत मौजमस्ती करणाऱ्या पतीला त्याच्या पत्नीने चांगलाच धडा शिकवला आहे. सदर महिलेने पतीचे सहकाऱ्यांच्या मदतीने फिल्मी स्टाईलने अपहरण केल्याची घटना नवी मुंबईतील न्हावा शेवा पोलिस ठाण्याच्या हद्दीत घडली आहे. सदर व्यक्तीचे अपहरण झाल्यानंतर अवघ्या 36 तासात पोलिसांनी तपास करत गोवा येथे तीन महिलांसह पाच जणांना अटक केली आणि पतीची सुखरूपपणे सुटका केली.

उपलब्ध माहितीनुसार, विजया राजन चिट्टीयार ( वय 45 ) असे त्यांचे नाव असून ते मूळचे तामिळनाडू राज्यातील रहिवासी आहेत. त्यांची विजय राजन बिल्डर्स अँड डेव्हलपर्स नावाने कंपनी असून नवी मुंबई इथे त्यांचे कार्यालय आहे. त्यांची विवाहित पत्नी अलगू मीनाक्षी ही तामिळनाडू इथेच राहत असून पती-पत्नी दूर राहत असल्या कारणाने आपल्या पतीचे विवाहबाह्य संबंध असल्याचा हलवू मीनाक्षी यांना संशय होता. सदर प्रकाराची कुणकुण लागताच संतप्त झालेल्या पत्नीने चक्क पतीचे अपहरण करून त्याला अद्दल घडवण्यासाठी आपल्या सहकाऱ्यांच्या मदतीने कट रचला .

पत्नी मीनाक्षी हिने नवी मुंबई गाठली आणि आपल्या दोन महिला सहकारी नागेश्वरी मुरुगण आणि रिहाना अन्सार यांना मालमत्ता खरेदी करण्याच्या नावाखाली बनावट ग्राहक बनून आपल्या पतीकडे पाठवले आणि अपहरणकर्त्यांनी दोन महिलांच्या मदतीने बिल्डर विजया राजन यांचे अपहरण करून गोव्याच्या दिशेने गाडीत पलायन केले. पोलिसांनी विजया राजन यांची सुटका केली असता त्यांच्या या अपहरणामागे त्यांच्या पत्नीचाच हात आढळून आल्याने पोलीस देखील हादरून गेले.


शेअर करा