महाराष्ट्र हादरला..अन ती म्हणाली ‘ आता हा माझ्या काय कामाचा नाही ‘ मात्र त्याआधी..

शेअर करा

महाराष्ट्रात अनेक धक्कादायक घटना समोर येत असून अशीच एक घटना जालन्यात उघडकीस आली आहे . प्रेयसीच्या आर्थिक मागण्यांना वैतागून प्रियकर तिच्या घरी पोहचला होता मात्र प्रेयसीने त्याला विष पाजले, असे या युवकाचे म्हणणे असून त्याने शुद्धीवर आल्यानंतर जालना पोलीस ठाण्यात प्रेयसी महिलेविरुद्ध जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याची तक्रार दाखल केली आहे. सदर महिलेवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

उपलब्ध माहितीनुसार ,रमेश नाथाराम घुगे असे या प्रियकराचे नाव आहे . रमेशचा मंडप डेकोरेशनचा व्यवसाय असून त्यातून तो आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह चालवत होता. जालना शहरातील शहरातील शिवनगर भागातील एका अंगणवाडी सेविका महिलेसोबत त्याचे मागील दीड वर्षांपासून प्रेमसंबंध सुरु झाले आणि त्यानंतर त्याने हळूहळू या महिलेस आर्थिक मदत करणे सुरु केले. पुढे पुढे तिला घरी लागणाऱ्या अत्यावश्यक वस्तूदेखील तो खरेदी करून देऊ लागला. त्याच्या या प्रेयसीने त्याला भुलवत त्याच्याकडून अशाच पद्धतीने वेळोवेळी कारणे सांगत चक्क पाच लाख रुपये उकळले.

दिवाळीच्या दिवशी तिच्या एका नातेवाईकाने रमेश याला फोन केला आणि तिला प्रोमोशनसाठी १० लाख रुपये हवे आहेत अशी मागणी केली.एकदा तू इतके पैसे दिले की परत तुला कधी त्रास देणार नाही असे देखील त्याला सांगण्यात आले म्हणून तो ६ नोव्हेंबर रोजी तिच्या घरी गेला. घरात गेल्यानंतर प्रेयसीने आपल्याकडे सीडीपीओ पदाच्या प्रमोशनसाठी दहा लाख रुपये हवे आहेत, अशी मागणी केली.

तुला पैसे प्रिय आहेत का मी ? असा प्रश्न रमेशने तिला विचारला त्यानंतर ती घरातून पाणी घेऊन आली आणि त्याला दिले. तिने दिलेले पाणी प्यायल्यानंतर रमेशला उलट्या होऊ लागल्या. उलटी होऊ लागल्याने तो बेसिनजवळ गेला असताना तिथे उंदिर मारण्यासाठी वापरण्यात येणारे औषध दिसल्याने तिने हेच विष आपल्याला पाजले असल्याचे त्याच्या लक्षात आले आणि त्यावरून त्याने तिला विचारण्याचा प्रयत्न देखील केला मात्र त्यावेळी प्रेयसीने रमेशकडे कामावरील मुलाला बोलावले व म्हणाली, ‘ आता हा माझ्या काहीच कामाचा नाही, याला घेऊन जा.. ‘ . सदर मुलगा तात्काळ रमेशच्या प्रेयसीच्या घरी आला आणि त्याने रमेश याला दवाखान्यात दाखल केले. शुद्धीवर आल्यावर त्याने प्रेयसीविरुद्ध तक्रार दिली असून तपास सुरु असल्याचे समजते.


शेअर करा