भिवंडीत ‘ त्या ‘ दोन महिलांची चांगलीच दहशत , केलाय असा कारनामा की ..

शेअर करा

चोरी करण्यासाठी कोण काय शक्कल वापरेल याचा भरवसा राहिलेला नाही. असाच एक प्रकार ठाणे जिल्ह्यातील भिवंडी इथे उघडकीस आला असून बुरखाधारी महिलांची सोन्याच्या दुकानदारांनी चांगलीच दहशत घेतल्याचे दिसून येत आहे. तोंडावर बुरखा असल्याने या महिलांचा चेहरा दिसत नाही म्हणून त्याचाच फायदा घेत या महिलांनी चक्क ९० नथी एका ज्वेलरीच्या दुकानातून पळवल्या आहेत

भिवंडी येथील बाजारपेठ पारनाका या ठिकाणी असलेल्या मानसी ज्वेलर्स दुकानात 6 नोव्हेंबर रोजी सायंकाळी साडेसहा वाजताच्या सुमारास दोन बुरखाधारी महिला आल्या होता. महिला नाकातील नथ व कानातील कर्णफुले घेण्यासाठी आपण आलो आहोत, असे सांगत होता . वेगवेगळ्या नथी पाहण्याच्या बहाण्याने त्यांनी आपापसात संगनमत करून दुकानाच्या काऊंटरवरील लाल रंगाच्या फोल्डर मध्ये लावून ठेवलेल्या 2 लाख 71 हजार रुपये किमतीच्या 90 नथी पळवल्या. अशाच स्वरूपाची घटना याआधी देखील उघडकीस आलेली आहे.

9 नोव्हेंबर रोजी दुकानदार प्रदिप प्रकाश सोनी यांनी सीसीटीव्ही तपासले असता महिलांचा हा कारनामा उघडकीस आला आहे . त्यानंतर त्यांनी निजामपुरा पोलीस ठाण्यात धाव घेत घडलेली हकीकत सांगितली असून दोन अज्ञात बुरखाधारी महिलांविरोधात चोरीचा गुन्हा दाखल केला आहे. शहराच्या मुख्य बाजारपेठेत अशा प्रकारच्या चोरीच्या घटना घडत असल्याने व्यापारी वर्गात भीतीचे वातावरण पसरले असून सदर महिला नक्की कोण होत्या याची काहीच माहिती आतापर्यंत हाती आलेली नाही.


शेअर करा