नगर हादरले..’ आई तुझा प्रियकर मलाच मिठी मारतोय ‘ मुलीचा धक्कादायक खुलासा अन त्यानंतर ..

शेअर करा

महाराष्ट्रात अनेक धक्कादायक घटना उघडकीस येत असताना अशीच एक घटना नगर जिल्ह्यातील नेवासा तालुक्यात उघडकीस आली आहे. आईच्या प्रियकराने मुलीवर अत्याचार केल्याची घटना नेवासा तालुक्यातील एका गावात अकरा तारखेला उघडकीस आली आहे. मुलीच्या आईने यासंदर्भात पोलिसात फिर्याद दिली आहे.

उपलब्ध माहितीनुसार, फिर्यादी महिलेने दहा वर्षापूर्वी आपल्या नवऱ्यापासून घटस्फोट घेतलेला असून त्यावेळी तिला एक मुलगी होती. घटस्फोट झाल्यानंतर तीन वर्षांतच या महिलेचे एका व्यक्तीसोबत प्रेमसंबंध सुरू झाले त्यानंतर त्या व्यक्तीपासून महिलेला एक मुलगा देखील झाला, असे तिने फिर्यादीत सांगितले आहे. महिलेच्या म्हणण्याप्रमाणे गुरुवारी संध्याकाळी सात वाजता महिला कामावरून घरी आल्यानंतर मुलीने तिच्या सोबत घडलेला धक्कादायक प्रकार आईला कथन केला .

‘ तीन दिवसापासून तुझा प्रियकर जवळ येऊन मिठी मारतोय ‘, असे मुलीने सांगितल्यानंतर आईच्या पायाखालची वाळूच सरकली मात्र आईने खचून न जाता आपल्या प्रियकराला याबद्दल जाब विचारला आणि त्याला समजावून सांगितले, मात्र तरीदेखील गुरुवारी रात्री जेवण करून झोपल्यानंतर महिलेच्या प्रियकराने रात्री अकराच्या सुमारास मुलीवर अत्याचार केला. मुलीने सकाळी हा प्रकार आईला सांगितल्यानंतर आईने तातडीने पोलिसात धाव घेतली आणि नेवासा पोलिस ठाण्यात या प्रियकराच्या विरोधात तक्रार दाखल केली.


शेअर करा