बायकोच्या ‘ असल्या ‘ प्रकाराला वैतागून अक्षरश: नवरा आश्रमात गेला तर तिथेही..

शेअर करा

देशात अनेक धक्कादायक घटना उघडकीस येत असताना अशीच एक घटना राजस्थान इथे उघडकीस आली असून हत्येमागचे कारण ऐकून पोलीस देखील हादरले आहेत. उदयपूरमध्ये तीन दिवसांपूर्वी पोलिसांना एका महिलेचा मृतदेह मिळाला होता. महिलेची ओळख पटवल्यानंतर पोलिसांनी तपास सुरु केला असता या खुनाच्या मागे चक्क या महिलेचा पतीच मास्टरमाइंड आढळून आला आहे . महिलेचे नाव हेमा चौहान असे असून तिचा पती दौलतसिंह याला अटक करण्यात आली आहे .

पती दौलत सिंहच्या जबाबानुसार, तो पत्नीसोबत घरात आधी दारू प्यायला आणि त्यानंतर दारूच्या नशेत तिच्या डोक्यात काठीने वार करून तिला बेशुद्ध केले. त्यानंतर दोरीने गळा आवळून तिची हत्या केली. याआधी देखील मी पत्नीला मारण्याचा प्रयत्न केला होता. मात्र तेव्हा ती वाचली होती म्हणून दारू पाजून तिला मारण्याचा प्लॅन केला . माझी पत्नी सतत फोनवर बोलत असायची काही काळानंतर तिने चक्क लोकांना व्हिडीओ कॉल देखील सुरु केले त्यामुळे चारित्र्यावर संशय आल्याने तिची हत्या केली , असे आरोपीचे म्हणणे आहे .

दौलत सिंहने सांगितले की, गावातील अनेक मित्र आणि नातेवाईक देखील पत्नीच्या चारित्र्याबद्दल अनेकदा कमेंट करायचे. याचे खूप वाईट वाटायचे. पत्नी अनेकदा मॉडेलप्रमाणे तिचे फोटो सोशल मीडियावर पोस्ट करत असे. आरोपीने तिचा मोबाईल नंबरही दोनदा बदलून घेतला, मात्र तिला ते आवडले नाही. नवीन नंबरवरून गावातील अनेक तरुणांशी ती बोलायची यामुळे निराश होऊन पतीने गाव सोडले. त्याने आश्रमात काम करण्यास सुरुवात केली मात्र तरीदेखील तिच्या वर्तनात बदल झाला नाही उलट तिच्याबद्दल पतीला आश्रमात देखील कमेंट ऐकाव्या लागत होत्या.

दौलत सिंह बऱ्याच काळापासून हेमाच्या चारित्र्यावर संशय घेत होता. हेमा खूप वेळ फोनवर लोकांशी बोलायची म्हणून पतीचा संशय बळावला.दौलतने पत्नीची हत्या केल्यानंतर कोणालाही शंका येऊ नये म्हणून पोलीस ठाण्यात जाऊन पत्नी बेपत्ता असल्याची तक्रार नोंदवली होती मात्र पोलिसांनी कसून चौकशी केली असता पतीने आपला गुन्हा कबूल केला आणि कट कसा रचला याबाबत माहिती दिली. पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत असून एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.


शेअर करा