‘ओली पार्टी ’ केल्याचा आरोप राष्ट्रवादीच्या आमदाराला लागला जिव्हारी..केली मोठी घोषणा ?

शेअर करा

राजकारणी मंडळी कठोर असतात आणि त्यांच्यावर कोणीही टीका केली तरी त्यांच्यावर काडीचा परिणाम होत नाही असा समाजात साधारण एक समज असतो मात्र राष्ट्रवादीच्या आमदाराला विरोधकांनी केलेला आरोप चांगलाच जिव्हारी लागला असून त्यांनी चक्क मांसाहार सोडण्याचीच घोषणा केलेली आहे. नगर जिल्ह्यातील अकोले तालुक्यातील आमदार डॉ. किरण लहामटे यांच्याबद्दलची ही बातमी आहे .

झाले असे की ,अकोले येथील राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार डॉ. किरण लहामटे यांच्यावर त्यांच्या विरोधकांनी ‘ओली पार्टी ’ केल्याचा आरोप केला तसेच या पार्टीत एका कोरोना बाधित रुग्ण असल्याचा देखील दावा भाजपचे तालुकाध्यक्ष सीताराम भांगरे यांनी केला. त्यानंतर ह्या संपूर्ण प्रकारची स्थानिक सोशल मीडियात मोठ्या प्रमाणावर चर्चा झाली.

सोशल मीडियात झालेल्या ह्या चर्चेनंतर आमदार डॉ. किरण लहामटे व्यथित झाले आणि त्यांनी, ” आपण दारू तर पित नाहीच, मांसाहार करीत होतो, तोही आजपासून बंद करीत आहोत. आधीदेखील आपण मांसाहार देखील करत नव्हतो. आरोप करणाऱ्यांच्या संगतीत पूर्वी असल्याने मांसाहार करायला शिकलो “, असा टोला देखील त्यांनी आरोप करणाऱ्यांना लगावला आहे तर आरोप करणारे सीताराम भांगरे यांनी, प्रश्न हा मांसाहाराचा नाही तर कंटेन्मेंट झोनमध्ये लोकप्रतिनिधीनेच पार्टी करून नियम मोडल्याचा आहे, असे उत्तर दिले आहे.

डॉ. किरण लहामटे पुढे म्हणाले की, ” मित्राच्या आग्रहाखातर मांसाहार करण्यासाठी गेलो होतो. मात्र विरोधकांनी आरोप करताना दारू पार्टीचा उल्लेख केला आहे.आपण दारू पित नाही. मांसाहार करीत होतो, तोही आता बंद करीत आहोत. मधल्या काळात बारा वर्षे मांसाहारही बंद होता. मात्र, भाजपमध्ये असताना आता आरोप करणाऱ्या नेत्यांनीच आपल्याला पुन्हा मांसाहार करण्यास शिकविले. त्यांना तर हा प्रकार रोजच चालतो. पार्टीत जो मित्र करोनाबाधित असल्याचा उल्लेख आहे, त्याच्याशी आपला संपर्क झालेला नाही. यानंतर आपण स्वत: चाचणी करून घेतली. त्याचा अहवाल निगेटिव्ह आला आहे. तरीही सरकारी नियम मोडला गेला असेल तर कारवाईला सामोरे जाण्यास आपण तयार आहोत “


शेअर करा